Top News

आमदार बंटी भांगडिया यांनी दिला लहान मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात...

आमदार बंटी भांगडिया यांनी दिला लहान मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात...



 नागभीड (ता.प्र.) :: चिमूर तालुक्यातील मौजा-आंबोली येथील रहिवाशी प्रशांत शालिक मोरे यांच्या मुलाला न्यूमोनिया झाल्याने  त्यांनी मुलाला  लगेच काळे हॉस्पिटल नागभीड यांच्या उपचारासाठी भरती केले परंतु परिस्थिती अभावी त्यांनी आर्थिक मदतीसाठी चिमूर विधानसभेचे आमदार बंटी भांगडिया यांच्या कडे आर्थिक मदतीची मागणी केली असता.

आमदार भांगडीया यांनी लगेच संतोष रडके तालुकाध्यक्ष नागभीड यांच्या मार्गदर्शनात व चिमूर विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, डॉ.दिवाकर चीलबुले ,निरज वारजुकर यांच्या हस्ते भाजपा कार्यालयात प्रशांत मोरे यांच्या कडे आर्थिक मदत सुपुर्द केली.

Previous Post Next Post