Top News

देशातील जनतेला अनेक संकटातून बाहेर काढणारे देशभक्त म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी - आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया

देशातील जनतेला अनेक संकटातून बाहेर काढणारे देशभक्त म्हणजे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी - आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया


नागभीड तालुक्यातील वलनी, नांदेड, गिरगांव, चिखलगाव, वाढोना व सावरगाव येथे भाजपा-महायुतीची कॉर्नर सभा संपन्न.....


स्थानिक ग्रामस्थांकडून आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या कॉर्नर सभेला उदंड प्रतिसाद 




काल दि. ११ एप्रिल ला आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत नागभीड तालुक्यातील वलनी, नांदेड, गिरगांव, चिखलगाव, वाढोना व सावरगाव येथे चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार खा. अशोक नेते यांच्या प्रचारार्थ भाजपा-महायुतीची कॉर्नर सभा पार पडली. याप्रसंगी आमदार बंटी भांगडीया यांनी सर्वप्रथम क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. स्थानिक ग्रामस्थांशी लोकसभा निवडणुकीसंदर्भात विविध विषयांवर संवाद साधला व विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपले अमूल्य मत भाजपा-महायुतीलाच देण्याची विनंती केली. दरम्यान, ग्रामस्थांच्या वतीने ठिकठिकाणी आमदार बंटी भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी उत्स्फूर्तपणे औक्षण करत पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत केले.



या कॉर्नर सभेप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधताना आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी म्हटले की, या देशाला ६० वर्षे लुटत स्वार्थ साधणारी भ्रष्ट काँग्रेस आहे. आपल्याला निवडायचं आहे आपलं उज्वल भविष्य, हा देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील जो १० वर्ष या देशाचं प्रामाणिकपणे नेतृत्व करतोय, १५ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व केलं. गेली २५ वर्षे ते पदावर आहेत परंतु; एकही विरोधक त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावू शकत नाही, निष्काळजीपणाचा आरोप लावू शकत नाही, निष्क्रियतेचा आरोप लावू शकत नाही, जो आपला संपूर्ण वेळ २४/७ तास देशाला देतो, स्वतःला देशासाठी समर्पित करतो. स्वतःच्या मातोश्रींचं निधन झालं असताना देखील अंत्यसंस्कार-अंत्यविधी झाल्याबरोबर स्वतःला या दुःखातून सावरत कोणताही मागेपुढे विचार न करता पुन्हा देशाच्या सेवेत रुजू होतो. कोविड सारख्या महामारीमध्ये या देशातील जनतेसोबत ठामपणे उभा राहणारा, कोविड सारख्या महामारीतून जनतेला सुरक्षित बाहेर काढणारा, तुमचा-आमचा कुटुंब प्रमुख म्हणून काम करणारा. असा एक सच्चा देशभक्त नरेंद्र मोदी यांच्या रूपात देशाला मिळालाय आता त्यांना आपल्याला गमवायचं नाही. आपल्या सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी त्यांच्या हातात परत या देशाची धुरा आपल्याला द्यायचीच आहे.


या लोकसभा निवडणुकीत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ हवी असून भाजपा-महायुतीने अबकी बार ४०० पार असा निर्धार केलेला आहे. चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार  खा. अशोक नेते यांच्या नावासमोरील ‛कमळ’ चिन्हाची बटन दाबून भाजपा-महायुतीलाच आपला मतरुपी आशीर्वाद आणि समर्थन देण्याचे आवाहन आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी समस्त मतदारांना केले. यावेळी तालुक्यातील समस्त भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post