ॲड.वामनराव चटप यांनी केला राधिका दोरखंडे हिचा सत्कार
विदर्भ माझा न्युज 24 - चंद्रपूर / राजुरा : मनोज श्रीहरी गोरे : उपजिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, नागपूर, अमरावती आंतर विद्यापीठाद्वारे गडचिरोली येथे आयोजित विद्यार्थ्यांच्या चर्चासत्र आणि पोस्टर प्रेसेंटेशन स्पर्धेमध्ये मध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल राधिका अविनाश दोरखंडे हिचा शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप, माजी नगराध्यक्ष रमेश नळे व राजुरा बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस यांनी घरी जाऊन सत्कार केला. विशेष म्हणजे पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मागे टाकत राधिका दोरखंडे या पदवीचे शिक्षण घेणा-या विद्यार्थीनीने यश मिळविल्याबद्दल ॲड.चटप यांनी तिचे कौतुक केले.
यावेळी शे.सं.तालुकाध्यक्ष शेषराव बोंडे, कपील इद्दे, माजी नगरसेवक मधुुकर चिंचोलकर, भाऊजी कन्नाके, नरेंंद्र मोहारे, बळीराम खुजे, सुरज गव्हाणे, वर्षाताई दोरखंडे, धनश्री धोटे उपस्थित होते.
