सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
28 फरवरी 2024 रोजी सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा याच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राध्यापक डॉ. रेखा जीभकाटे उपस्थित होत्या त्यांनी आपल्या भाषणात विज्ञान दिवसा चे महत्त्व विशद केले त्याचप्रमाणे रमण इफेक्ट् बद्दलची माहिती विशद केली तसेच आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाला किती महत्त्वाची स्थान आहे . यासंबंधीचे विस्तृत विवेचन केले व विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून राष्ट्राच्या विकासात योगदान देण्याचे आव्हान केले प्रस्तुत कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून टिंकल इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या पोहेकर उपस्थित होत्या त्यांनी विज्ञान कसे शिकले पाहिजेत व विज्ञान चा अर्थ काय व विज्ञान समजून घेणे किती गरजेचे आहे याबाबत विस्तृत विवेचन केले प्राध्यापक देवयानी खोब्रागडे यांनीही कार्यक्रमाच्या प्रसंगी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याचा सल्ला दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. रेवतकर यांनी केले याप्रसंगी बीए व बीएससी च्या सर्व विद्यार्थ्यांनी साठी प्रश्नमंजुषा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता . यामध्ये एकूण चार राऊंडमध्ये प्रश्न विचारण्यात आले . प्रश्नमंजुषा मध्ये गट क्रमांक 1 ने जास्तीत जास्त उत्तरे देऊन विजय मिळवला . या गटामध्ये बीए च्या विद्यार्थिनी नीलिमा सहारे , रवीना चंदनखेडे , अश्विनी बसेशंकर व त्यांची चमू सहभागी होती . कार्यक्रमा चे सूत्रसंचालन सानिया जांभुळे हिने केले तर आभार प्रदर्शन करूना शिवणकर हिने केले . प्रस्तुत कार्यक्रमाला प्रा. कुंभरे , निमगडे समस्त विद्यार्थ्यांनी उपस्थित होत्या. कार्प्रयक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सावरकर , ऐश्वर्या तर्वेकर यांनी अथक परिश्रम घेतले .
