सचिन कोरडे यांची उद्यान पंडित करिता तर अमोल नेमाडे यांची शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार करिता निवड
विदर्भ माझा न्युज 24 - तेल्हारा : (ता.प्र.) मनोज भगत
तेल्हारा तालुक्यातील रायखेड येथील शेतकरी अमोल नेमाडे यांची वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कारासाठी तर हिगणी येथील सचिन गजाननराव कोरडे यांची उघानपंडीत पुरस्कारासाठी निवड झाली आहे
राज्यात कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार वसंत राव नाईक कृषी, जिजामाता कृषीभुषन, कृषी भुषन सेंद्रीय शेती, वसंतराव नाईक शेती मित्र, युवा शेतकरी , उघानपंडीत, वसंतराव नाईक शेती निष्ठ शेतकरी पुरस्कार सर्वसाधारण गट, आदिवासी गट पदश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार आयुक्तांलय मंत्रालय स्तर असे विविध पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने सन 2020, 2021,2022, करीता विविध कृषी पुरस्कार प्रदान करून शेतकऱ्याना सन्मानित करण्यास शासनाने मान्यता दिली असून यामध्ये तेल्हारा तालुक्यातील रायखेड ता तेल्हारा येथील अमोल नेमाडे याची वसंतराव नाईक पुरस्कारासाठी तर हिगणी ता तेल्हारा येथील शेतकरी सचिन गजाननराव कोरडे यांची उघानपंडीत पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
