आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड तालुक्यातील विलम येथे सामाजिक सभागृह बांधकामाचा शुभारंभ
समस्त विलम वासीय ग्रामस्थांच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत व सत्कार
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते नागभीड तालुक्यातील विलम येथे ग्रामविकास योजना २५१५ अंतर्गत ४० लक्ष रुपयांच्या सामाजिक सभागृह बांधकामाचा भूमीपुजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बंटि भांगडीया उपस्थित ग्रामस्थांसह भूमिपूजन स्थळी विकासकामाच्या फलकाचे अनावरण करून व कुदळ मारून सभागृह बांधकामाचा शुभारंभ केला. त्यानंतर सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित ग्रामस्थांशी विविध विषयांवर संवाद साधून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त विलम वासीय ग्रामस्थांच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत स्वागत केले आणि या विकासकार्याबद्दल त्यांचा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे, माजी बांधकाम सभापती/नगरसेवक न. प. नागभीड सचिन आकुलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, भाजपा नेते विलास डोनाडे, सरपंच्या ग्रा. पं. विलम निरांजना बावणे, उपसरपंच ग्रा. पं. विलम नितीन सोनडवले, ग्रा. पं. सदस्य नाजूक कुंभरे, ग्रा .पं. सदस्य प्रमोद डवले, ग्रा .पं. सदस्या वनिता शंभरकर, ग्रा .पं. सदस्या जयश्री पारखी, ग्रा .पं. सदस्या शोभा पारखी, माजी कृ.उ.बा. समिती संचालक बाळूजी डवले, भाजपा बूथ अध्यक्ष पुरुषोत्तम डवले व अन्य मान्यवर आणि विलम वासीय ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
