गोंडवन विकास संस्था नागभीड च्या सुवर्णं महोत्सव व स्व. ज.स. जनवार जन्म शब्दाती महोत्सव कार्यक्रम संपन्न......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
नागभीड : हल्ली चे जग जे झपाट्याने बदलत असून आपल्या सर्वांच्या मनात मी पनाची भावना भरलेली असून जो तो स्वतःचा विकास यालाच महत्व देत असून अश्या या वातावरणात पर्यावरण,जातीय सलोखा, व इतर समस्या या कडे लक्ष देण्यासाठी आजच्चा शिक्षणाने 'वसुधैव कुटुम्बकम् ' हा मूल्य आजच्या शिक्षणाने आजच्या विद्यार्थ्यामध्ये रुजवायला पाहिजे असे विचार सरसंघाचालक मोहन भागवत यांनी गोंडवन विकास संस्था नागभीड च्या सुवर्णं महोत्सव व स्व. ज.स. जनवार जन्म शब्दाती महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केला..!!
या प्रसंगी मोहन भागवत यांनी कर्मवीर विद्यालय नागभीड येथील नवनिर्मित स्व. वसंतराव कसबेकर सभागृहाचे उदघाटन केले..कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव रवी जनवार सर यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला.. व या जन्मशताब्धी सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवत यांचे दर्शन लाभले हे आमचे भाग्य आहे असे विचार व्यक्त केले.. सरसंघचालक मोहन भागवत यांनी जाती पातीतील दरी संपविण्यासाठी सर्व जातीच्या प्रमुखांनी एकत्र येत संवाद साधत जो कमकुवत गट आहे त्याचा विकास केला पाहिजे. मुलांच्या विकासात आई वडिलांची भूमिका महत्वाची असून आई वडिलांनी केवळ मुलांना पैसे कमवा असे सांगू नये तर कमवलेले पैसे चांगल्या ठिकाणी कुठे खर्च करायचे याचे सुद्धा शिक्षण देणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले..
आयुष्यात कितीही मोठे झालात तरी उतू नका मातू नका.. असे उपस्थित सर्वांना सांगितले या बरोबरच कितीहि यशाची मोठी भरारी घेतली तरी आपली जी सुरुवातीला परिस्थिती होती तिला कधीही विसरू नका तिला स्मरणात ठेवा..याचं पद्धतीचे शिक्षण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी जनवार गुरुजी यांनी चंद्रपूर आणी गडचिरोली सारख्या ग्रामीण भागात कार्य केले.. व आज मला या ठिकाणी बोलवलं हे माझे भाग्य समजतो असे मत व्यक्त केले..!!!
गोंडवन विकास संस्था, नागभीड सुवर्ण महोत्सव व स्व.ज.स. जनावर जन्म शताब्दी महोत्सव समारोप सोहळा निमीत्त प्रमुख अतीथी मा.प.पू. सरसंघचालक मोहन भागवत,अध्यक्ष्यस्थानी संस्थाध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, प्रमुख उपस्थिती लोकप्रिय आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया, प्रमुख उपस्थिती रविंद्र ज. जनवार हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भाष्कर उरकुडे यांनी केले, प्रास्ताविक रवींद्र जनवार यांनी तर उपस्थितांचे आभार स्वप्नील नवघडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व कर्मकचारिवृंद यांनी सहकार्य केले.


