Top News

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते व अथक प्रयत्नातून नागभीड नगर परिषद क्षेत्रातील नवखळा येथे माँ माणिकादेवी सभागृह बांधकामाचा शुभारंभ

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते व अथक प्रयत्नातून नागभीड नगर परिषद क्षेत्रातील नवखळा येथे माँ माणिकादेवी सभागृह बांधकामाचा शुभारंभ


आदिवासी माना समाज बांधवांकडून आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे जल्लोषात स्वागत व सत्कार


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

 आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांच्या शुभहस्ते व अथक प्रयत्नातून नागभीड नगर परिषद क्षेत्रातील माँ माणिकादेवी मंदिर देवस्थान, नवखळा येथे १ कोटी रुपयांच्या आदिवासी माना जमातीचे आराध्य दैवत माँ माणिकादेवी सभागृह बांधकामाचा भूमीपुजन सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार बंटी भांगडीया सर्वप्रथम माँ माणिका देवीची पूजाअर्चा करून मनोभावे दर्शन घेतले. उपस्थित समाजबांधवांसह भूमिपूजन स्थळी पूजन करून व कुदळ मारून सभागृह बांधकामाचा शुभारंभ केला. त्यांनंतर कार्यक्रम स्थळी सर्व थोर महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित समाजबांधवांना विविध विषयांवर संबोधित करून शुभेच्छा दिल्या. दरम्यान, समस्त माना समाजाच्या वतीने आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचे वाजतगाजत मिरवणूक काढून व ठिकठिकाणी माता - भगिनींनी औक्षण करत उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि या विकासकार्याबद्दल त्यांचा माँ माणिका देवीची प्रतिमा व शाल - श्रीफळ, पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. 


यावेळी प्रामुख्याने भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके,  माजी नगराध्यक्ष न. प. नागभीड प्रा. उमाजी हिरे,भाजपा ज्येष्ठ नेते विलास डांगे, भाजपा ज्येष्ठ नेते घनश्याम डुकरे,


माजी बांधकाम सभापती/नगरसेवक न. प. नागभीड सचिन आकुलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती चिमूर अध्यक्ष संजय नवघडे, भाजपा नेते जहांगीर कुरेशी, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, विलास डोनाडे, धनराज ढोक, धनराज काटेखाये, श्रीराम समर्थ, यशवंत कावळे, दिलीप चौधरी, बाबुराव बारेकर, अतुल गरमडे, दडमल गुरुजी, प्रकाश दडमल व अन्य मान्यवर आणि आदिवासी माना समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post