सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण सप्ताह संपन्न.
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
सरस्वती जैरामजी तर्वेकर ( कला व विज्ञान) महिला महाविद्यालय नागभीड येथे विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रशिक्षण सप्ताह चे आयोजन करण्यात आले होते . समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर , सचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या प्रशिक्षण सप्ताहात सौंदर्य प्रसाधन विषयक प्रशिक्षण, पर्यावरण संरक्षणात पशु पक्ष्यांचे योगदान, केक मेकिंग प्रशिक्षण, पुष्पगुच्छ सजावट, मेहंदी प्रशिक्षण, आरोग्य विषयक मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी शिबिर, साडी ड्रेपिंग प्रशिक्षण अश्या विविध विषयांवर प्रशिक्षण महाविद्यालयात देण्यात आले .
सौंदर्य प्रसाधन विषयक प्रशिक्षणात सौ. उर्मिला अमृतकर यांनी मार्गदर्शन केले, पर्यावरण संरक्षणात पशु पक्षांचे योगदान यात डाॅ. पवन नागरे यांनी मार्गदर्शन केले, केक मेकिंग प्रशिक्षण सौ. आरती भोयर यांनी दिले तर पुष्पगुच्छ सजावट विषयी दिपाली नागरीकर यांनी मार्गदर्शन केले, मेहंदी प्रशिक्षण चे मार्गदर्शन कु.सोनाली कोलते यांनी केले, आरोग्य विषयक मार्गदर्शन व वैद्यकीय तपासणी शिबिरात सौ.सीमा मेश्राम,प्रतिभा भोगेकर ,देवानंद खोब्रागडे, मनोज जिवतोडे, अभिजीत इत्यादींनी मार्गदर्शक केले व तपासनी शिबीर घेतले. साडी ड्रेपिंग प्रशिक्षण कु.सोनाली कोलते यांनी विद्यार्थ्यानींना मार्गदर्शन केले. असे विविध प्रशिक्षण घेण्यात आले.
वरील सर्व कार्यक्रम प्राचार्या डॉ.रेखा जिभकाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले . सदर कार्यक्रमाचे उद्देश विद्यापीठाचे " शिका व कमवा " या उदेषानुसार विद्यार्थ्यानींना आत्मनिर्भर करने व त्यांच्यात नवी उमेद निर्माण करणे हे होय. प्रशिक्षणा नंतर विद्यार्थ्यानीं मध्ये एक नवी उर्जा निर्माण झाली.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमात प्रा.हिवदास कुंभरे, प्राध्यापिका देवयानी खोब्रागडे, प्रा.सायली भाकरे, प्रा अंजली निमगडे, प्रा.सोनू रेवतकर, प्रा रोशन गेडाम, प्रा. शैलेश भुरसे यांचे भरीव योगदान लाभले.
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रभाकर सावरकर, रुक्मिणी मानापूरे, ऐश्वर्या तर्वेकर, पराग गुंडेवार यांनी अथक परिश्रम घेतले.
