Top News

ग्रामपंचायत हिरापूरतर्फे ३९४ वा शिवजन्मोत्सव थाटात साजरा

ग्रामपंचायत हिरापूरतर्फे ३९४ वा शिवजन्मोत्सव थाटात साजरा


विविध स्पर्धा,आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन


छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने महाराजांना अभिवादन


विदर्भ माझा न्युज 24 - सावली

 तालुक्यातील मौजा.हिरापूर येथील ग्रामपंचायत कार्यालयातर्फे महाराष्ट्राचं आराध्य दैवत,कुळवाडीभूषण,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९४ व्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा,आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून अभिवादन करण्यात आले.संपूर्ण देशात शिवजन्मोत्सव म्हंटला की मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येकाच्या घरी आनंदाचा, उत्साहाचा सोहळाच असतो, महाराजांचे विचार,विविध क्षेत्रातील त्यांचं कार्य आणि कर्तृत्व, राजनीतिक कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापनेचं चातुर्य हे येणाऱ्या पिढ्यांपिढ्यासाठी मार्गदर्शक आणि आदर्श घालून देणारं आहे.

आज हिरापूर येथे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यांचे उदघाटन सरपंच प्रीती गोहने,उपसरपंच शरद कन्नाके यांच्या हस्ते करण्यात आले. सकाळी मिरवणूक काढण्यात आली,तसेच आरोग्य शिबीर व नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले होते शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला तसेच वक्तृत्व स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, सामूहिक नाट्य स्पर्धा व संध्याकाळी सामूहिक नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 

कार्यक्रमाला सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,ग्रामपंचायत सदस्य रुमा कोरडे,माधुरी आत्राम,निता मुनघाटे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप सायत्रावार,तंटामुक्ती अध्यक्ष कालिदास मेश्राम,सेवा सोसायटी अध्यक्ष काशिनाथ भोयर,प्रतितशिष्ट नागरिक महेश्वर गेडाम,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,सामाजिक युवा कार्यकर्ते सुभाष भोयर,ताराचंद गोहने यांच्यासह मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी नितेश कन्नाके,संदीप शेंडे,रोजगार सेवक राजेंद्र पेंदाम यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post