सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड येथे शिवजयंती उत्सव संपन्न झाला समिधा सेवा संस्था चे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला. महाविद्यालयात शिवजयंती उत्सव साजरा करतांना कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रेखा जीभकाटे उपस्थित होत्या . कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यअर्पण करून दीप प्रज्वलनाने झाली कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे अनेक प्रसंग विशद केली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक हिवदास कुंभरे यांनी केले.
विद्यार्थिनींनी शिवाजी महाराजांचा उज्वल इतिहास सांगणारे सुंदर गीत प्रस्तुत केले प्राचार्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण तत्कालीन परिस्थितीची माहिती तसेच जिजामातांचं शिवरायांना घडविण्यात योगदान , आग्रा भेट , प्रतापगड वरील विजय , शाहिस्तेखानाची फजिती , स्त्रियांविषयीचा आदर इत्यादी प्रसंग वर्णन केले . कार्यक्रमाचे संचालन महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी विशाखा ठीकरे हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थ्यानी कुमारी नीलिमा सहारे हिने केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रभाकर सावरकर , ऐश्वर्या तर्वेकर व रुक्मिणी मानापुरे यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने व राष्ट्र गीताने झाली .
