ट्विंकल इंग्लिश स्कुल (सी.बी.एस.ई) नागभीड येथे प्रजासत्ताक दिन साजरा...
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल (सी.बी.एस.ई.) नागभीड, ता.नागभीड, जि.चंद्रपूर येथे 26 जानेवारी 2024 रोजी 75 वा प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळयाला समिधा सेवा संस्थे चे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचिव अजय काबरा तसेच पवन नागरे, निर्मला चिल्लूरे, संगिता आंबोरकर, अमित देशमुख, प्रविण बंडावार हे सदस्यगण तसेच शाळेच्या प्राचार्या शुभांगी पोहेकर व मुख्याध्यापिका संगिता नारनवरे, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या रेखा जिभकाटे आदी मान्यवर तसेच पालक व विदयार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी संस्थेचे सचिव अजय काबरा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन करण्यात आला.या वेळी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत गायण्यात आले व शाळेचा परिसर विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर नाऱ्यांनी दुमदुमला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक क्रिडा महोत्सवात अनेक स्पर्धा घेण्यात आल्या हया स्पर्धा मध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे बक्षिस वितरण आणि वर्धा इथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धा मध्ये प्राविन्य प्राप्त विद्यार्थ्यांचे शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चिमुर अंतर्गत जांभूळघाट इथे विज्ञान प्रदर्शनी स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत प्राविन्य प्राप्त विद्यार्थींनी शिल्ड आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाची सांगता वंदेमातरम् गीताने व मुलांना खाऊवाटप करून झाली.
या प्रतासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी यशस्वी गेडाम. अवंती चौधरी हया विद्यार्थीनी आणि शिक्षक महेश जिभकाटे, रोशन गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिक शैलेश भुरसे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक, शिक्षिका व कर्मचाऱ्यांनी अथक मेहनत घेतली.




