सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदाता दिवस व मकर संक्रांतीचा कार्यक्रम संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
सरस्वती जय रामजी तर्वेकर महिला महाविद्यालयामध्ये आज 25 जानेवारी 2024 ला राष्ट्रीय मतदाता दिवस व मकर संक्रांतीचा कार्यक्रम उत्साहात व आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. प्रस्तुत कार्यक्रम प्रसंगी समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर व सचिव अजय काबरा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर रेखा जिभकाटे उपस्थित होत्या याप्रसंगी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मकर संक्रांतीचे महत्त्व पटवून दिले व मकर संक्रांत जीवनात किती उत्साह आणि आनंद प्रदान करणारा सण आहे याचे महत्त्व विद्यार्थीनींना समाजावून सांगीतले त्याचप्रमाणे राष्ट्रीय मतदाता दिवस कार्यक्रमाचे औचित्य साधून मतदार नोंदणी कशी आवश्यक आहे व मतदारांनी आपले हक्क आणि कर्तव्य बजावने किती गरजेचे आहे त्याचे महत्त्व विद्यार्थीनींना सांगीतले.
कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक कुंबरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुमारी अंकिता हिने केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व बहुसंख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी प्रभाकर सावरकर,रूखमीनी मानापुरे,ऐश्वर्या तर्वेकर यांनी अथक परीश्रम घेतले.
