उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागभीड शहर प्रमुख सह कार्यकर्त्यांचा भाजपा पक्षात प्रवेश....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
भारतीय जनता पार्टी चे केंद्रात लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आणि विधानसभेतील आमदार बंटी भांगडिया या सर्वांच्या नेतृत्व शक्तीवर विश्वास ठेऊन आज दि.27 जानेवारी 2024 उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख संतोष बुरबांधे, राहुल ठाकुर, विनोद खांदारे यांनी आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. आमदार बंटी भांगडिया यांनी भारतीय जनता पक्षाचा दुपट्टा गळ्यात टाकून व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे पक्षात स्वागत केले. व पुढील वाटचालीसाठी मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,तालुकाध्यक्ष संतोष रडके,कृ.ऊ.बा.समिती सभापती आवेश पठाण,भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुम्पल्लीवार, घनश्यामजी डुकरे,वॉर रूम प्रमुख सचिन आकुलवार,माजी तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम,पराग गुंडेवार, बंडू गेडाम,धनराज काटेखाये, रमाकांत ठाकरे, महिला आघाडी प्रमुख इंदु आंबोरकर तथा अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते,महिला आघाडी सदस्य मोठ्या संखेने उपस्थित होते.
