ट्विंकल इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात साजरा......
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
श्रीमती रामप्यारीदेवी आसारामजी काबरा ट्विंकल इंग्लिश स्कूल नागभीड येथे दिनांक 29 डिसेंबर 2023 ला ''मेलोडीअस इव्हनींग''{Melodious Evening} आणि 30 डिसेंबर 2023 ''एक भारत-श्रेष्ठ भारत'' या थिमव्दारे वार्षिकोत्सव साजरा करण्यात आला.
वार्षिकोत्सवाचे उद्घाटन संचालक धनश्री पथसंस्था, तळोधी तथा गोशाला प्रमुख मनोज हंबर्डे, प्रमूख अतिथी प्राचार्य कर्मविर विद्यालय नागभीड देविदास चिलबुले, पालक प्रतिनीधी सतिश माटेटवार, जयश्री काटेखाये, समिधा सेवा संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, संस्थेचे सचिव अजय काबरा , सदस्य पवन नागरे, प्रविण बंडावार, अमित देशमुख, अविनाश चौधरी, शाळेचे प्राचार्या शुभांगी पोहेकर, सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा जिभकाटे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता नारनवरे यांच्या उपस्थितीत पार पडला.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिमुर- नागभीड विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया, सरचिटणीस बि.जे.पी. गडचिरोली गोविंद सारडा, पालक प्रतिनीधी श्रीकांत मांडे, नितु गुल्हाणी यांच्या प्रमूख उपस्थितीत पार पडला. आमदार बंटी भांगडीया यांनी आपल्या भाषणांतून विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण लक्ष अर्जुनासारखे आपल्या ध्येयावरती केंद्रीत करून त्या दृष्टीने अभ्यास केला पाहिजे जेणे करून ते भावी आयुष्यात चांगले यशस्वी नागरीक बनून स्वत:चा तसेच देशाचा विकास करता येईल. तसेच देविदास चिलबुले यांनी विविध स्पर्धेतून विजयी विद्यार्थ्यांचे कौतूक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना असेच आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेचा वार्षिक अहवाल वाचन शाळेच्या प्राचार्या शुभांगी पोहेकर यांनी केले. संचालन शाळेच्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनी केले.
यावेळी समुह नृत्य, वेशभुषा, नाटीका, गीतगायन यांचे आयोजन करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांचे चित्रप्रदर्शन, आयोजन करण्यात आले. या वार्षिकोत्सवामध्ये विद्यार्थ्यांव्दारे "नृत्यनाटीका-रामलीला" सादर करण्यात आली, जी कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरली.
स्नेहसंम्मेलनाच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी तथा शाळेचे विद्यार्थी आणि विद्यार्थींनी यांनी सहकार्य केले.






