Top News

थंडीपासून बचावण्याकरीता गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप.....Distribution of blankets to the poor to protect them from cold.

थंडीपासून बचावण्याकरीता गरिबांना ब्लॅंकेटचे वाटप......


डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवाराचा नवीन वर्ष निमित्याने उपक्रम.....


विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)

सध्या थंडीचे दिवस असून सर्वसामान्य व्यक्ती आपली थंडी उबदार कपडे घालून कमी करू शकतो मात्र जे वंचित आहेत गोरगरीब आहेत त्यांच्या पोटाची खडकी भरतानाच अडचण येते तर त्यांनी गरम कपडे कधी खरेदी करायचे अशा वंचितांना आधार देण्यासाठी त्यांची थंडी काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न डॉ.अशोक जीवतोडे मित्र परिवारातर्फे चंद्रपूर शहरात गरजवंतांना ब्लॅंकेट वाटप करून त्यांना मदत करण्यात आली.


डॉ. अशोक जीवतोडे मित्रपरिवार सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करत असतात,ओबीसी नेते अशोक जीवतोडे हे विदर्भातील सामजिक चळवळीत नेहमीच पुढे असतांना दिसतात  या नववर्षानिमित्त डॉ. अशोक जीवतोडे मित्र परिवारातर्फे शहरातील गरजवंतांना ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले. 

 यावेळी मंगेश पाचभाई,राहुल ठाकूर,अनिकेत सातपुते,गौरव कोळेकर, गौरव पोहेकर, जयेश बूछे अभिनव किनेकर  आदी उपस्थित सहकारी उपस्थिती  होते.

Previous Post Next Post