सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयात वार्षिक महोत्सव साजरा....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
समिधा सेवा संस्था नागभीड द्वारा संचालित सरस्वती जयरामजी तर्वेकर महिला महाविद्यालय नागभीड 1येथे दिनांक 29 डिसेंबर 2013 ते 30 डिसेंबर 2023 या दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थींच्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता व विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा या दृष्टीने सांस्कृतिक महोत्सवाचे महाविद्यालयाद्वारे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाप्रसंगी चिमुर विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार बंटी भांगडिया हे आवर्जून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव अजय काबरा व संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर विशेष मार्गदर्शक म्हणून लाभले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मनोज हंबर्डे गौशाला संचालक व प्राचार्य देविदास चिलबुले कर्मवीर महाविद्यालय नागभीड व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा जीभकाटे ह्या उपस्थित असून यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनातून विविध उदाहरणे देऊन त्यांना संबोधित केले
त्यानंतर लगेचच सांस्कृतिक संगीतमय बहारदार वातावरणात विद्यार्थिनींनी विविध आपले कौशल्यपूर्ण नृत्य व नाटकाद्वारे गीताद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले व प्रस्तुत कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक कुंभरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक कोसे यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे संपूर्ण प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तथा पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.


