सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
समीधा सेवा संस्था द्वारे संचालित सरस्वती जैरामजी तर्वेकर महिला महाविद्यालयातर्फे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती संस्थेचे अध्यक्ष गणेश तर्वेकर, सचीव अजय काबरा यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डाॅ.रेखा जिभकाटे ह्या उपस्थीत होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणुन प्रा.अंजली निमगडे, रुक्मीनी मानापुरे, ऐश्वर्या तर्वेकर ह्या उपस्थीत होत्या.
या वेळी प्रभाकर सावरकर, महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
प्राचार्य डाॅ. रेखा जिभकाटे यांनी सावित्रीबाईंना अभिवादन करतांना सांगितले की सावित्रीबाई यांनी स्त्री शिक्षणासोबतच विधवांचे पुनर्विवाह, अस्पृश्यता निर्मूलन, महिलांना शोषणातून मुक्त करणे तसेच दलित महिलांना शिक्षित करणे यांसारखी महत्वाची कार्ये सुद्धा केली. तसेच विद्यार्थिनी कु.विशाखा ठीकरे ने सावित्रीबाईंच्या जीवनावर अप्रतिम गीत सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन बीए ची विद्यार्थांनी विशाखा ठिकरे हिने केले तर आभार प्रदर्शन विद्यार्थीनी संजना मुळे, प्रास्ताविक प्रा. हिवदास कुंभरे यांनी केले.
प्राचार्यांनी यावेळी विद्यार्थिनींकडून काही प्रतिज्ञा करून घेतली ती अशी की संपूर्ण पदवी प्राप्त होईपर्यंत कोणीही मधून कॉलेज सोडणार नाही ही खरी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना आदरांजली असेल असे ठोस विचार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.



