वेगळ्या विदर्भ राज्यासाठी आमरण उपोषण चौथ्या दिवशीहि सुरूच.....
महिला उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली......
विदर्भवादी कार्यकर्ते आक्रमक....जागो जागी विदर्भवाद्यांचा रस्ता रोको सुरु......
विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर
विदर्भ राज्य आंदोलन समितीने दि. २७ पासून सुरु केलेले आमरण उपोषण अव्यास सुरु असून आज चौथ्या दिवशी सर्व विदर्भवादी दटून आहेत. यात १ विदर्भवादी नेत्या रंजना मामर्डे यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे पाठविण्यात आले त्यांची तपासणी झाल्यानंतर त्यांना अमरावतीला रवाना करण्यात आले. याप्रमाणे हे आंदोलन पूर्णपणे दटून राहील.
३१ डिसेंबर २०२३ पर्यंत केंद्र सरकारने घटनेच्या आर्टिकल ३ प्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी त्यांना बाध्य करण्यासाठी हे आंदोलन सुरु आहे आम्ही (विदर्भ राज्य आंदोलन समितीने) जाहीर केल्याप्रमाणे मिशन २०२३ अंतर्गत “विदर्भ मिळवू औंदा”, “अभी नही तो कभी नही” म्हणून हा निर्णायक लढा “आमरण / प्राणांतिक उपोषणाचे” हत्यार उपसून आम्ही आपला आत्मक्लेश या निमित्ताने व्यक्त करण्यासाठी हे आंदोलन आहे. १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत विदर्भातील ११ ही जिल्ह्यातील १२० ही तालुक्यातील जनतेनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष ॲड. वामनराव चटप यांनी केले.
विदर्भाचे वेगळे राज्य निर्माण करा या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीने सुरु केलेले आमरण उपोषण आज दुसऱ्या दिवशीही सुरु होते. समितीचे नेते ॲड. वामनराव चटप यांच्या सह, अरुण केदार, ज्योती खांडेकर, मोहम्मद आरिफ शेख, सुदाम राठोड, निळकंठराव घवघवे, विठ्ठलराव दोरखंडे, पंढरीनाथ घाटे, बालाजी पाटील काकडे, बबनराव ठाकरे, दादाराव कोळे, उषा लांबट उपोषण करीत आहेत.
या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि संघटनांनी संपूर्ण पाठिंबा देत विदर्भाच्या मागणीला नव्याने बळ दिले. उपोषण स्थळी नरेश निमजे-शहर अध्यक्ष विराआंस, प्रा. रमेश पिसे-राष्ट्रीय समाज पक्ष, सुयोग निलदावार-कोअर कमेटी सदस्य, घनश्याम पुरोहित, गजानन अमदाबादकर, सुनील वडस्कर व वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी, डॉ. तन्हा नागपुरी-सामाजिक सुरक्षा मंच, एड. अविनाश काळे-बापुजी अने स्मारक समिती, डॉ. अमिताभ पावडे, अरुण बनकर-कम्युनिस्ट पार्टी, अहमद कादर- विदर्भ जॉईंट अँक्शन कमिटी, शैलाताई देशपांडे व माजी आमदार सरोजताई काशीकर-शेतकरी संघटना, माजी राज्यमंत्री डॉ. रमेशकुमार गजबे, यांच्यासह अनेकांनी आंदोलन स्थळी भेट आणि समर्थनार्थ भाषणे दिली. आंदोलन स्थळी ॲड. मृणाल मोरे, राजेंद्र सतई, प्यारु उर्फ नौशाद हुसैन, श्रीकांत दौलतकर, डॉ. रामकृष्ण पौनीकर, पंकज साबळे, प्रशांत तागडे, विठ्ठलराव मानेकर हे स्वयंसेवा देत आहेत.
