#विशेष लेख...
कणसातही काही कणस दाणेदार असतात.....माणसातही काही माणसं बाणेदार असतात - संजय येरणे.
माजी जि.प. सदस्य तथा भाजपा जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपूरे यांच्या वाढदिवसा निमीत्त विशेष लेख..
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
अगदी असंच राजकीयच नव्हेतर सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक मन जपत सर्वांच्या शब्दाला धावून हाक देणारे हे उत्तुंग व्यक्तिमत्व,
एक बिजा केला नाश मग भोगीले कणीस
गावासाठी स्वतःच्या श्रमाचा कणकण दान करून समाजसेवाव्रत होत शेतकऱ्यागत धान्याची रास समोर ठेवणारा, आजच्या काळातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजेच संजयभाऊ गजपुरे,
अनेक मानाची पद भूषवीत जमिनीवरच पाय ठेवून तटस्थ उभा असणारा प्रसंगी कनवाळू होऊन आसवे गाळणारा,
महाभारतातील संजयप्रमाणे दिव्यदृष्टी ठेवून पुढील भाकीते जगणारा, मात्र अश्वत्थामाप्रमाणे कपाळावर भडभडती जखम घेऊन मनात कुडत जगणारा, कर्णासारखं दानशूर होऊन जगताना त्याचीच कवच कुंडले हिरावून गेले असतानाही तो समाजाकडे अगदी आशेने बघणारा,
नागभीडच्या इतिहासात असे समाजमन जपणारा दुसरा नेता मला तरी कुठेही दिसत नाही. भाऊशी ना नातेसंबंध नाही की मित्रत्व नाही, पण भाऊवर अपार माया श्रद्धा ठेवणारी माझ्यासारखी अनेक व्यक्तिमत्व यात आहेत, भाऊ बद्दल काय लिहावे?
मात्र तो लिहावयाचा दिवस नक्कीच येईल, भाऊ तेव्हा तुझं जीवन चरित्र नक्कीच साकार करेन पुस्तक रूपाने,
भाऊ उदंड आयुष्याच्या भरभरून शुभेच्छा.... तुला, वहिनीला आणि तुझ्या कुटुंबाला....
तुला जे दिसते
तेच तू सांगत असतोस
तुझ्या दिव्यादृष्टीचे कारण
देवाशप्पथ
तू संजयच नसतास
लहान होऊन आशीर्वाद देऊ शकत नाही पण या जगाची आभाळभर माया, प्रेम, यश अनेक मनातून तुलाच अप्रत्यक्षरीत्या मिळते आहे. आज तुझा खास दिवस... आमच्यासाठी तू देवाहून प्रिय आहेस. भाऊ... तुला... तुलाच खूप खूप शुभेच्छा रे!
✍️शुभेच्छुक....संजय येरणे.
