आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांचा अखिल कुणबी समाजाच्या वतीने सत्कार
कुणबी समाजाचे ऋण कधीही विसरू शकत नाही, समाजाचा आशीर्वाद सदैव माझ्याच पाठीशी - आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया
विदर्भ माझा न्युज 24 - ब्रम्हपुरी
दि. २७ जानेवारी/ आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी ब्रह्मपुरी येथे अखिल कुणबी समाज मंडळ द्वारा आयोजित कुणबी मेळावा, उप वधु-वर परिचय मेळावा, गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार समारंभ कार्यक्रमाला सत्कारमूर्ती म्हणून उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी सर्व थोर संत महात्म्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले आणि उपस्थित समाजबांधवांशी विविध विषयांवर संवाद साधून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाप्रसंगी आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते समाजाच्या विविध गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
दरम्यान, आमदार बंटी भांगडीया यांचे आगमनाप्रसंगी उपस्थित माता-भगिनींनी औक्षण करत पिवळी टोपी भेट देऊन स्वागत केले. तसेच, आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी अखिल कुणबी समाजाच्या उन्नतीसाठी तथा समाजोपयोगी कार्यासाठी स्वनिधीतून २१ लक्ष रुपयांची भरघोस आर्थिक मदत दिल्याबद्दल त्यांचा अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरी च्या वतीने सन्मानचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी समाजबांधवांशी सवांद साधताना म्हटले की, आमदार परीणय यांनी सांगितलं बंटी आमदार जर झाला असेल तर आपल्याच म्हणजे समाजाच्याच आशीर्वादाने, आपल्याच शक्तीवर हे बंटी कधीही आयुष्यभर नाकारू शकत नाही की आपला आशीर्वाद बंटीच्या पाठीशी नाही.
आपला सर्वांचा आशीर्वाद सदैव माझ्याच पाठीशी आहे, समाजाचे ऋण कधीही विसरू शकत नाही. मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो की समाजाचे प्रश्न माझ्यासमोर मांडलेत, मला आपलंसं समजून घेत इथे बोलावून निमंत्रित करून जो माझा मान-सन्मान सत्कार केला आणि माझा जो उत्साह, जी ताकद आपण वाढविली त्यासाठी मी आपले मनापासून आभार मानतो. या मंचावरून इतकाच विश्वास देतो की, मी आपल्या विश्वासावरच खरा उतरण्याचा परिपूर्ण प्रयत्न करेल, आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही हा सुद्धा विश्वास या मंचावरून व्यक्त करतो.
यावेळी प्रामुख्याने कार्यक्रमाचे उद्घाटक - भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनिल मेंढे, कार्यक्रमाचे अध्यक्ष - राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, महाराष्ट्र राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार, प्रमुख पाहुणे - विधान परिषद सदस्य आ. परीणय फुके, वरोरा विधानसभा क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, प्रमुख मार्गदर्शक - डॉ. अभिविलास नखाते (शिवतीर्थ-उमरी डॅम, ता. सावनेर, जि. नागपूर), प्रमुख उपस्थिती - माजी अध्यक्ष - जिल्हा परिषद चंद्रपूर देवराव भोंगळे, अध्यक्ष - खेडुले कुणबी संघटना वर्धा जिल्हा अभय शिंगाडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रपूर-गडचिरोली विष्णु तिवाडे, संचालक - चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक दामोधर मिसार, अध्यक्ष - (जि) कुणबी समाज पुरुषोत्तम सहारे, अखिल कुणबी समाज मुख्य कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष - रुषी राऊत, सचिव - ॲड. गोविंद भेडारकर, उपाध्यक्ष - प्रमोद चिमुरकर, सहसचिव राजेश पिलारे, कोषाध्यक्ष - फाल्गुन राऊत, सदस्यगण - ओमप्रकाश बगमारे, रामकृष्ण चौधरी, अल्काताई खोकले, भाऊराव राऊत, योगेश मिसार, जगदिश (मोंटू) पिलारे, सल्लागार मंडळ - प्राचार्य डॉ. देवीदास जगनाडे, हरीशचंद्र चोले, डॉ. सतिश दोनाडकर, कृष्णाजी सहारे, प्रेमलाल धोटे, उमेश धोटे तसेच, भाजपा जिल्हा महामंत्री कृष्णा सहारे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा नागभीड तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, नागभीड कृ.उ.बा. समिती संचालक गणेश तर्वेकर, भाजपा ओबीसी आघाडी चिमूर तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे, भाजपा चिमूर शहराध्यक्ष सचिन फरकाडे, भाजयुमो नागभीड शहराध्यक्ष हेमंत नन्नावरे, भाजपा नेते राजू पिसे, भाजपा युवा कार्यकर्ते शुभम येरणे, भाजपा युवा कार्यकर्ते अक्षय बडगे व अन्य मान्यवर आणि कुणबी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.




