Top News

पीपरी ग्रमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार.......Sanjay Gandhi Niradhar Yojana President and Committee felicitated on behalf of Pipri Villagers

पीपरी ग्रमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार


 ना.  सुधीर मुनगंटीवार वन, मत्स्य,सांस्कृतिक कार्यक्रम व पालकमंत्री वर्धा,चंद्रपूर यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष यांची ग्वाही


विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : उपजिल्हा प्रतिनिधी : मनोज श्रीहरी गोरे

कोरपना तालुक्यातील पीपरी ग्रमवासियाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष व समितीचा सत्कार वृद्ध महिला व वृद्ध नागरिकांनी शाल, श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे भरवुन मोठ्या उत्साहात करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे  तिरुपती कन्नाके आदिवासी नेते, समीर पटेल अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष कोरपना, मनोज गोरे तालुका प्रतिनिधी, कमलाकर गुंजेकर, गुलाबराव मेश्राम, शशिकांत जेनेकर, अनिल चांदेकर तंटामुक्त अध्यक्ष, शफी खान पठाण, नतेश चालेकर,मंगला ताई आंबेकर समाजसेविका, नसिम पठाण रोजगार सेवक आदी मान्यवर उपस्थित होते संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष  नारायण हिवरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात पीपरी ग्रमवासियाच्या वतीने आज जो माझा वयोवृद्ध महिला,पुरुषांनी मोठ्या उत्साहात व आनंदाने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व पेढे भरवुन सत्कार केला हा सत्कार मी जिवनात कधीच विसरू शकत नाही मा ना  सुधीर  मुनगंटीवार पालकमंत्री यांनी माझ्यावर वयोवृद्ध महिला,पुरुष,निराधार, निराश्रित,गोर गरीब जनतेची सेवा करण्याची जबाबदारी दिली आहे. ती मी प्रमानिक पणे पार पडित आहो मी पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सदैव जनतेच्या सेवेसाठी प्रयत्न करत राहिन पात्र लाभार्थ्यांना विनंती करतो की त्यांनी स्वतः पुढे येऊन फार्म भरुन कार्यालयात द्यावे कोणतीही अडचण आल्यास संजय गांधी निराधार अध्यक्ष,समिती सदस्य, तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधावा कोनत्या ही मध्यस्ती व्यक्ती च्या मागे लागु नये हि सर्वांना आग्रहाची विनंती आहे कोणताही खर्च येत नाही असे मत व्यक्त केले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला गावातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल चांदेकर यांनी केले तर आभार मंगला ताई आंबेकर समाजसेविका यांनी मानले

Previous Post Next Post