शेंडेगाव येथील राष्ट्रसंत पुण्यतिथी संपन्न......
आजचा युवक कुठं चालला, व्यसना धीन कडे - राजु देवतळे
विदर्भ माझा न्यूज 24 - चिमूर
शेंडेगाव येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव च्या काल्या प्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ चे कार्यकारणी सदस्य राजु देवतळे यांनी आपले विचार व्यक्त करीत असताना ते म्हणाले की गावाचा विकास करायचा असेल तर सामुदायिक प्रार्थना महत्वाची असल्याचे सांगत महिला उपस्थिती बद्दल नाराजी व्यक्त करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार, तत्वज्ञान गावात अमलात आणणे आवश्यक असल्याचे सांगत गाव, शिक्षण,आजचा युवक कुठे चाललं,व्यसनाधीन युवक अनेक विषयावर मार्गदर्शन करीत सामुदायिक ध्यान व प्रार्थना वेळी प्रत्येक कुटुंबानी येण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास आमदार बंटी भांगडिया नागपूर हिवाळी अधिवेशन मुळे येऊ शकले नाही. तरी साधू संताचे विचार या मतदार क्षेत्रात पोहचविण्याचे काम सातत्याने करतात तसेच सर्वधर्म सम भाव हा विचार घेवून पुढे चालतात म्हणून च त्यांची अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ मोझरी चे संचालक पदी नियुक्ती झाली असे विचार राजु देवतळे यांनी व्यक्त केले.
४ वाजून ५८ मिनिटांनी मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजयुमो तालुका अध्यक्ष बालू पिसे, गुरुदेव सेवा मंडळ चे आजीवन प्रचारक हभप प्रा अशोक चरडे, कृष्णाजी तपासे आदी गुरुदेव व्यास पिठावर उपस्थित होते. गावातील गुरुदेव भक्त मंडळी उपस्थित होते.
