Top News

मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देते, बाल आनंद मेळावा - नारायण नीलकंठ हिवरकर.....Gives scope to children's inherent talents, Bal Anand Melava - Narayan Neelkanth Hivarkar

  मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देते, बाल आनंद मेळावा - नारायण नीलकंठ हिवरकर


विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना - उपजिल्हा प्रतिनिधी : मनोज श्रीहरी गोरे 

             दिनांक  16/12/2023 रोज शनिवारला एक अदभूत उपक्रम " खरी कमाई " अंतर्गत " बाल आनंद मेळाव्याचे " आयोजन जिल्हा परिषद हायस्कूल कान्हाळगाव  येथे उत्स्फूर्तपणे साजरे करण्यात आले . 

         सदर  " बाल आनंद मेळाव्याचे " रीतसर उद्घाटन  नारायण हिवरकर शा. व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद पेंदाम सर, उद्घाटक नारायण हिवरकर, प्रमुख अतिथी आणि परीक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्यध्यपिका पुष्पा सोयम ,आणि कनिष्ट सहायक प्रियंका भगत उपस्थित होते. 

            मुलांना एक वेगळा आणि नावीन्यपूर्ण अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी, प्रत्यक्ष कृतीतून व्यवहारज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी "बालआनंद मेळावा " आयोजित करण्यात आला होते...

                 आनंद मेळाव्यात विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अतिशय उत्साहाने खूप छान छान चविष्ट व चटकदार खाद्यपदार्थ बनवून आणले होते. स्टॉलची मांडणी, विविध पदार्थांची सजावट, त्यांची विक्री, खरेदी व विविध पदार्थांचा आस्वाद घेण्याचा आनंद मुलांनी लुटला. या बाल आनंद मेळवाला यशस्वी करण्यासाठी  स्वतंत्रकुमार शुक्ला , . संजय डोये, अफसना अली,  रोहिणी आडे, सुरज जुनघरी,  प्रफुल जीवने,प्रियांका भगत, मनवर आदींनी मोलाचे सहकार्य केले.

                सर्व  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष , सदस्य , विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांनी  आनंद सोहळ्यात आनंद घेतला.

      कार्यक्रमाचे संचालन  प्रफुल जीवने, तर आभार प्रदर्शन एस. के. शुक्ला यांनी केले.

Previous Post Next Post