Top News

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कळमना येथे कब्बडी सामन्यांचे उद्घाटन.....Inauguration of Kabaddi matches at Kalamana by Sarpanch Nandkishore Gaddai.

सरपंच नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते कळमना येथे कब्बडी सामन्यांचे उद्घाटन. 



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा - उपजिल्हा प्रतिनिधी : मनोज श्रीहरी गोरे 

 राजुरा तालुक्यातील मौजा कळमना येथे भव्य कब्बडी सामान्यांचे उद्घाटन कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, तरुण पिढीने कब्बडी सारखे कसरतीचे खेळ खेळले पाहिजे. या खेडामधुन शारीरिक, बौद्धिक क्षमता, बौद्धिक चातुर्य विकसित होण्यासाठी मदत होते. आजच्या युवकांनी कब्बडी खेळा बरोबर शैक्षणिक दृष्ट्या अभ्यास करून प्राविण्य मिळवले तर त्यांना आपले आयुष्य सुखमय करता येईल. 

       या प्रसंगी पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, उपसरपंच कौशल्या कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश वाढई, माजी तंटामुक्ती अध्यक्ष महादेव ताजणे, ग्राम पंचायत सदस्य साईनाथ पिंपळशेळे, सुनिता उमाटे, रंजना दिवाकर पिंगे, प्रभाकर साळवे अध्यक्ष हनुमान मंदिर, जेष्ठ नागरिक सुधाकर पिंपळशेळे, मारोती साळवे, शेख बाबु, कवडु गौरकार, मंगेश ताजणे, अमोल निमकर, प्रशांत ताजणे, दिनेश वाढरे, प्रणय वाढई, हनुमान मंडळाचे अध्यक्ष धीरज विददे, सचिव नयन वाढई यासह कब्बडी खेळाडू, स्थानिक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post