Top News

स्वतंत्र पोलीस चौकीच्या 35 वर्षाच्या मागणीचे स्वप्न अखेर पूर्ण.......The dream of a 35-year-old demand for an independent police station has finally been fulfilled

 स्वतंत्र पोलीस चौकीच्या 35 वर्षाच्या मागणीचे स्वप्न अखेर पूर्ण



विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ/आर्णी : ता.प्र. हिरासींग राठोड

 पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावळी सदोबा या ग्रामीण भागातील 42 गावातील नागरिकांना कायदा व सुव्यस्था  बाधित ठेवत परिसरातील नागरिकांच्या संरक्षनात सदैव तत्पर राहणाऱ्या सावळी सदोबा पोलीस चौकीचे आज ३५ वर्षाच्या मागणीनंतर अखेर स्वप्न पूर्ण झाले,सावळी सदोबा येथील नवीन पोलीस चौकीच्या इमारतीचे मा.जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोडे यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले, त्यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मागील काळात मी सावळी सदोबा या चौकीला भेट दिली तेव्हा इथे कार्यरत पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अनेक सुविधा मिळत नसल्याचे पाहायला मिळाले

जिल्ह्यातील सर्वात मोठी पोलीस चौकी असल्याने या चौकीत दोन महिला कर्मचारी असणे आवश्यक असताना,सुविधेच्या अभावाने आपण महिला कर्मचारी येथे कशा राहतील, हा गंभीर प्रश्न होता,आपण आपल्या परिवारातील सदस्यांना जशी सेवा पुरवतोय त्याचप्रमाणे मी ज्या परिवारात राहतोय त्या पोलीस परिवारातील सर्व सहकाऱ्यांना सेवा पुरवणे माझं कर्तव्य आहे,त्यामुळे सावळी सदोबा येथे कार्यरत अधिकाऱ्यांना मागील काळात काम करताना जो त्रास व्हायचा, त्याची दखल घेऊन आणि सावळी सदोबा परिसरातील गावकऱ्यांच्या स्वातंत्र्य पोलीस चौकीच्या मागणीचा आदर करत, आज अखेर ते स्वप्न पूर्ण झाले, या कामामध्ये अनेक कर्मचारी अधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहेत त्यांच्यामुळेच आज हे काम पूर्ण झाले असे मनोगत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केले,या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले या विधानसभा क्षेत्राचे आमदार संदीप धुर्वे यांनी सुद्धा सावळी सदोबा येथील पोलीस चौकीच्या इमारती बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची चर्चा करून ही इमारत पोलीस विभागाच्या ताब्यात देण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे सांगितले, पोलीस प्रशासनाकडून चांगलं काम होईल अशीही आशा आमदार महोदयांनी पोलीस प्रशासना प्रति दाखवली,यावेळी पत्रकारांनी आमदार संदीप धुर्वे यांना निम्न पैनगंगा प्रकल्पाविषयी आपलं काय मत आहे असे विचारले असता आमदार धुर्वे यांनी पत्रकारांना याबाबत बोलण्यास टाळाटाळ केली,पत्रकारांनी याबाबत अनेक प्रश्नांचा भडीमार केला असता आमदार धुर्वे यांना वाचा फुटली,मी जनतेसोबत असल्याचे सांगण्यात आले,निम्न पैनगंगा प्रकल्पा विरोधात परिसरातील शेतकऱ्याकडून मागील अनेक दिवसापासून धरणग्रस्त क्षेत्रातील अनेक गावात तथा सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर मागील अनेक दिवसापासून साखळी उपोषण,जलसमाधी आंदोलन,तथा मागील सहा दिवसापासून आमरण उपोषण चालू असुन,त्यामधील अनेक आंदोलनकर्त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे,आमदार संदीप धुर्वे यांनी सावळी सदोबा परिसरातील खडका व उमरी (काप) येथिल उपोषण मंडपाला भेट दिली,मात्र आमदार धुर्वे यांनी सावळी सदोबा येथील नायब तहसील कार्यालयासमोर चालू असलेल्या आमरण उपोषण मंडपाला भेट दिली नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली,या कार्यक्रमाला उपस्थित,डॉ.पवन बनसोड जिल्हा पोलीस अधीक्षक,संदीप धुर्वे-आमदार रामेश्वर व्यंजने,(एसडीपीओ) पांढरकवडा,विजय साळवे  तहसीलदार घाटंजी,एस.आर.घोडेराव उपविभागीय अभियंता,प्रमोद पांडे, प्रवीण लिंगाडे ठाणेदार पारवा,संदीप बारींगे-सावळीसदोबा दूरक्षेत्र,राहुल वानखडे एपीआय-बाळासाहेब शिंदे सरपंच सावळी सदोबा,मुबारक तंवर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,प्रल्हादराव जगताप,विजय राऊत,प्रल्हाद गावंडे, मिलिंद पाटील,अहमद तंवर,विजय समगीर,नितिन खोडे,प्रमोद बनसोड,अमित पाटीलसह परिसरातील पोलीस पाटील,सरपंच,उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष,प्रतिष्ठित नागरिक तथा पोलीस विभागातील कर्मचारी उपस्थित होते,

Previous Post Next Post