सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे सादर केला तालुका काँग्रेसच्या कार्याची वार्षिक अहवाल माहिती पुस्तिका..
नागपुरात काँग्रेसची विभागीय बैठक संपन्न काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांची उपस्थिती
विदर्भ माझा न्युज 24 - सावली
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या निर्देशनुसार जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बाबींची माहिती जाणून घेण्याकरीता व आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनाच्या निवडणूकाच्या पूर्वतयारी करीता नागपुर येथे विभाग जिल्हानिहाय आढ़ावा बैठक दि. १२/१०/२०२३ रोजी नागपूर येथील महाकालकेशकरं सभागृहात पार पडली.
या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवारजी,प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटीलजी,माजी मंत्री डॉ. नितीन राऊत,माजी मंत्री सुनील केदार,आमदार अभिजित वंजारी, महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, यांच्यासह अनेक काँग्रेसचे मातब्बर नेते उपस्थित होते.
सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने चालू वर्षात १ जानेवारी ते ०८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत सावली तालुका काँग्रेस कमिटीतर्फे घेण्यात आलेल्या कार्यक्रमांचा व विविध उपक्रमांचा अहवाल,मासिक बैठका,कार्यकर्ता आढावा बैठक, राबविण्यात आलेली विविध कार्यक्रमावली, थोर महापूरुषांचे जयंती- पुण्यथिती अभिवादन कार्यक्रम,महिला सक्षमीकरण,आंदोलने, विविध मोर्चे,राज्य शासनास निवेदने संघटनात्मक बाबींची व इतर उपक्रमाची सविस्तर वार्षिक अहवाल माहिती पुस्तिका राज्याचे विरोधी पक्षनेते,माजी मंत्री व विद्यमान आमदार ना.विजय वडेट्टीवार यांना सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकार्यांनी सादर केली.
याप्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहणे,सावली तालुका महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषा भोयर, माजी सभापती पंचायत समिती सावली व जेष्ठ काँग्रेस कार्यकर्ते राकेश पाटील गड्डमवार, सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष किशोर कारडे,ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष दिलीप लटारे, ग्रामपंचायत उसेगावचे उपसरपंच सुनील पाल तसेच काँग्रेस इतर पदाधिकारी उपस्थित होते.

