Top News

साखरी ग्रामपंचायत तर्फे आठवडी बाजार शुभारंभ सोहळा संपन्न... सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांचे मोलाचे योगदान... Sakhri Gram Panchayat Inauguration Ceremony of Athwadi Market Completed... Valuable contribution of social worker Subhash Gore...

साखरी ग्रामपंचायत तर्फे आठवडी बाजार शुभारंभ सोहळा संपन्न...


सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांचे मोलाचे योगदान...




विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा



राजुरा तालुक्यातील श्रीमंत गाव म्हणून ओळखले जाणारे साखरी गाव ह्या गावामध्येकोळसा खाणी मोठ्या प्रमाणात असून येथील जास्तीत जास्त लोक wcl  मध्ये नोकरी करतात.साखरी गाव राजुरा तालुक्या पासून लांब आहे त्यामुळे तेथील लोकांना. आपल्या उदरणीवाह करण्यासाठी लागणारे साहित्य घेण्यासाठी लांब प्रवास करावा लागतो .होत असलेला गावातील लोकांचा त्रास पाहून ग्रामपंचाययात साखरी यांनी पुढाकार घेऊन गावामध्ये आठवडी बाजार चालू करण्याचा निर्णय घेतला. 



सामाजिक कार्यकर्ते सुभाष गोरे यांनी आपले विचार ग्रामपंचायत मध्ये मांडले गावामध्ये आठवडी बाजार चालू करण्यात यावा याच्यावर चर्चा केली आणि त्यांची विचार ग्रामपंचायतने मान्य केले गावात होणारा त्रास बाजारासाठी जा यासाठी होणारा येण्या-जाण्याचा लोकांना होणारा त्रास ह्या गोष्टी लक्षात घेऊन गावामध्ये आठवडी बाजाराचे आयोजन करण्यात आले.

पहिले बाजारात येणाऱ्या व्यक्तीसशाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलागावामध्ये भाजीपाला कपडे विक्रेते यांचे दुकाने बसण्यात आली. 



आठवडी बाजाराचा शुभारंभ करतेवेळी गावातील उपस्थितसरपंच प्रणाली शंकर मडावी ,उपसरपंच संतोषजी डोंगे,ग्रामपंचायत सदस्य सोनाली विजय काटवले,ग्राम प.स.निराश मडावी ,समाजिक कार्यकर्ते सुभाष चिमणाजी गोरे,युवा नेते कार्तिक सुभाष गोरे,मिथुन कटवले, अमोल देरकर,धनराज उरकुडे,मनोज गालफाडे,विनोद ढोबे ,मधुकर काटवले,ग्राम.प.स.यशोदाबाई आत्राम,ग्राम.प.स.शामराव आत्राम,सुरेश पिंपळकर,राजू देवगडे,आशिष चौधरी,भाऊराव गोरे,प्रदीप गावंडे ,आशिष दातारकर ,कुशाब कौरसे ,विजय कटवले.इत्यादी ग्रामवासी उपस्थित होते.

Previous Post Next Post