Top News

Inauguration of Junior IAS Competitive Exam Guidance Center at Korpana

कोरपना येथे जूनिअर आयएएस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घघाटन संपन्न




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना

चंद्रपूर जिल्हाच्या शेवटच्या टोकावरिल कोरपना तालुक्याच्या ठीकानी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एमपीएससी सैन्य दल , पोलिस, वन, आरोग्य व इतर क्षेत्रात मुले यश संपादन करीत आहे, तालुक्याच नाव ऊंचावत आहे. त्याच हेतुन जून २०१८ ला मि आयएएस होनारच ही डॉ.पंजाबराव देशमुख एकेडमी अमरावती चे संचालक व स्पर्धा परीक्षा आयोजन समितीचे सल्लागार डॉ. नरेशचंद काठोड़े यांची मार्गदर्शन कार्यशाला घेन्यात आली होती त्यातुन प्रेरणा घेऊन ग्रामीण भागातील मुलाना स्पर्धा परिक्षेची माहिती, मार्गदर्शन लहान वयातील  विद्यार्थीना, पालकाना झाले पाहिजे व या स्पर्धा परीक्षाचे माध्यमातून प्राथमिक स्तरापासुन मूल तयार झाली पाहिजे, पाया मजबूत झाला पाहिजे या उद्दात्त हेतुन गेल्या दहा वर्षापासुन सुरु असलेल्या नवनिर्मिती बहुउद्देश्य संस्था  लातुर संचालित संस्कार ज्यूनीअर आयएएस स्पर्धा २०२४ ही परीक्षा जानेवारी ला होत आहे यासाठी राज्य मंडलाचा अभ्यासक्रम आधारित वस्तुनिष्ठ प्रश्न असलेले पुस्तक उपलब्ध करून देऊन स्वयंमूल्यमापना वर आधारित असुन - जिद्द, मेहनत केली,ध्येय उराशि ठेवले तर यश नक्कीच प्राप्त होईल. वेध भविष्याचा घेन्यास ही स्पर्धा परीक्षा नियमित देने गरजेचे असल्याचे प्रतिपादन उदघाटनिय भाषनातून ज्येष्ठ नागरिक मंडळ चे अध्यक्ष उत्तमराव मोहितकर यांनी व्यक्त केले. प्रारंभ विदेही सदगुरू जगन्नाथ बाबा यांच्या प्रतिमापूजनाने झाला.

अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक उत्तमराव मोहितकर, विशेष अतिथि परीवीक्षाधीन नायब तहसीलदार प्रतिक बोरडे, होते तर सेवानिवृत शिक्षक संजीव चांदूरकर, साधु बावने,नागोसे, जिल्हा परिषद शाला तांबाली चे बालाजी नरवटे, गोंडे, ज्येष्ठ नागरिक सत्यवान घोटेकर, दिलीप जेनेकर, शेख मामू, अनील कवरासे, विनोद मालेकर, ऋषि जोगी, विजय टोंगे,महेश ढवस, यांच्या उपस्थितित सेवानीवृत प्राचार्य संजय ठावरी यांच्या मार्गदर्शन केंद्राचे उद्घघाटन पार पडले . 

परीक्षासाठी प्रविष्ठ  सना नादिर शेख़ हिचे  आजोबा अब्दुल वहाब शेख यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात् आला तर या परीक्षा साठी सर्वाधिक मूल प्रविष्ट झालेल्या एमिनेंस कॉन्वेंट चे श्रीकांत लोडे यांचाही पाहुन्याचे हस्ते सत्कार पार पडला.

 प्रसंगि प्राथमिक स्तरा पासुन स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा असलेल्या गरीब होतकरु,उच्च शिखर गाठन्यास अशा दोन विद्यार्थीना दहावीपर्यंत दरवर्षी परीक्षा फि व स्टडी मटेरियल साठी एक हजार रूपये देऊन दत्तक घेण्याची घोषणा चांदूरकर यांनि केली. व रोख रक्कम दिली, परीसरातिल कॉन्वेंट, विद्यालयाची ३०० चे वर विद्यार्थी प्रविष्ट झाले असुन, कार्यक्रमास बालके व पालक उपस्थित होते आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यसाठी पालकानी अंतिम दिनांक पूर्वी आपल्याशी संपर्क साधुन प्रवेश नक्की करा, असे आवाहन केंद्र संचालक सेवानिवृत प्राचार्य ठावरी  यांनी केले आहे. सेल टैक्स इंस्पेक्टर निलेश मालेकर यानी सपत्नीक , समाजसेवक प्रशांत लोडे, राजु वैरागडे , दीपक पारखी यांनि भेट वस्तु देऊन उपक्रामचे कौतुक केले व पुढील वाटचालिस शुभेच्या दिल्या. अनुराग ठावरी याने सर्वाँचे आभार माले  समाजातील दानशुरानी ग्रामीण भागातील  विद्यार्थीना प्रोत्साहन देने गरजेचे आहे.



Previous Post Next Post