वनसडी येथे शासन आपल्या दारीं उपक्रम आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते नागरिकांना विविध योजनांचा लाभ....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना - ग्रामीण प्रतिनिधी नितेश केराम +91 8698423828
कोरपना तालुक्यातील मौजा वनसडी येथे महाराष्ट्र शासनाच्या महाराजस्व अभियानांतगर्त शासन आपल्या दारीं समाधान शिबीर आमदार सुभाष धोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले यात कोरपना तालुक्यातील नागरिकांना विविध शासकीय योजना व सेवांचा एका छत्राखाली विविध विभागांचा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार धोटे यांच्या हस्ते लाभ देण्यात आला.
या प्रसंगी तहसीलदार प्रकाश वराडकर, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, आर.एफ.ओ. चौधरी, कृषी अधिकारी ठाकूर, गटविकास अधिकारी पेंदाम, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र माने, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, माजी जि. प.सदस्य उत्तमराव पेचे, माजी उपसभापती सिंधु अस्वले, सरपंच लता गेडाम, सुरेखा जोगी, विमला सिडाम, राजू कलगट, इरफान शेख, भास्कर जोगी, रोशन अस्वले, मधुकर गौरकार, विट्टल उरकुडे, भारत थोडसे, राजकुमार बावणे, प्रकाश मोहुर्ले, अविनाश भोयर, मिलिंद ताकसांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
