कठोर परिश्रम हा स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्याचा मंत्र - वैभव लोणारे
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कठोर परिश्रम व चिकाटी यास पर्याय नाही. त्यामुळे कोचिंग क्लासेसच्या आमिषाला व फसव्या जाहिरातींना भुलू नका असा सल्ला वैभव लोणारे यांनी प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयातर्फे आयोजित तीन दिवसीय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिला.
समाजाच्या उद्धारासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षा द्याव्यात व त्यामध्ये यशस्वी होऊन स्वतःला समाजसमोर सिद्ध करावे उच्च पदाधिकारी होत असताना समाजाची असणारी आपली नाळ कायम ठेवावी असे आवानही त्यांनी केले.तर महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर धोटे यांनी आपल्या अधक्ष्यीय भाषणामधून सदन कुटुंबातील मुलेच अधिकारी होतात हा समज सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनी कायमचा काढून टाकावा, कठोर परिश्रम व आत्मविश्वासाच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होता येते. आपल्यातील कमतरता दूर करीत यशाची पायरी चढावी असे मार्गदर्शन त्यांनी केले.
तर प्रास्ताविक मधून प्रा.एजाज शेख यांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा उपक्रमा विषयी माहिती दिली.सदर तिन दिवसीय पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणामध्ये पहिल्या सत्र मध्ये रोज सकाळी फिजिकल ट्रेनिंग नागेश वाट यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत होते.तर दुसऱ्या सत्रामध्ये वैभव लोणारे यांच्यातर्फ़े विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा व अभ्यासक्रम याविषयी माहिती देण्यात येत होती.तर शेवटच्या सत्रामध्ये मुलांचा सराव पेपर घेण्यात येत होता.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अरविंद मुसने,प्रा.राहुल ठोंबरे,प्रा.रोशनी खाते,प्रा.छायांक तिराणीक, प्रा.सपना पवार उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन रुपाली टेकाम हिने तर,आभार अश्विनी जांभोर हिने मानले.

