वरूर रोड येथील मनोरंजन क्लब तात्काळ बंद करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा महिलांचा इशारा....
युवा विकास मंचचे पदाधिकारी आदित्य भाके ह्यांच्या नेतृत्वात विरुर पोलीस निरीक्षक ह्यांना निवेदन
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथे 2019 मध्ये शासनाने मनोरंजन केन्द्रा ला मान्यता दिली होती वास्तविक वरूर रोड हे आदिवासी बहुल आणि शंभर टक्के शेतकऱ्यांचे वास्तव्य असणारे गाव आहे ,आशा ठिकाणी शासनाने एका परप्रांतीय व्यक्तीस मनोरंजन केंद्राच्या नावाखाली जुगार क्लब चालवण्यास परवानगी द्यावी हे आश्चर्यकारक होते शिवाय ह्या मनोरंजन केंद्राच्या 100 मीटरच्या आत दोन शाळा आणि एक चर्च म्हणजे धार्मिक स्थळ आहे असे असतानाही शासनाने ह्याला परवानगी दिली ,परंतु ह्या मनोरंजन केंद्रात क्लबच्या नावाखाली अनेक अवैध व्यवसाय चालायचे ज्याचा त्रास गावातील शाळकरी मुली महिला ह्यांना व्हायला लागला,कारण परप्रांतातील अनेक धनाढ्य लोक ह्या क्लब मध्ये मुक्कामी यायचे व तिथे त्यांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवल्या जायच्या,ह्या क्लब मध्ये चालणाऱ्या हुल्लडबाजी चा त्रास ग्रामिणाना झाल्यामुळे ह्या दोन्ही शाळा चर्च शिवाय ग्रामपंचायत ने देखील हा क्लब बंद करावा अशी मागणी केली होती,शेवटी ह्या क्लब विरोधात तक्रारी वाढल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नेतृत्वात ह्या क्लब वर धाड टाकण्यात आली परंतु इथे उपस्थित जुगाऱ्यानी पोलिसांवरच हल्ला केला ज्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता,शेवटी सी 60 च्या कमांडो आणि दंगा नियंत्रक पथकाच्या साहाय्याने कारवाई करण्यात येऊन क्लब संचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, ही सर्व परिस्थिती पाहता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या क्लबचा परवाना रद्द केला होता ह्या विरोधात क्लब संचालकांनी प्रधान सचिव(अपील व सुरक्षा ) ह्यांच्याकडे अपील दाखल केले, मंत्रालायस्तरावरून ह्याबाबत अहवाल मागण्यात आल्यावर पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी ह्यांनी ह्याबाबत नकारात्मक अहवाल देऊनही मंत्रालय सस्तरावरून ह्या क्लबला मान्यता देण्याबाबत सूचना देण्यात आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या क्लब ला मान्यता दिली, जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यता पत्रात ह्याबाबत स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, हा क्लब सुरू होताच पुन्हा तीच स्थिती निर्माण होत असून गावातील शेतकरी ह्या क्लबच्या नादी लागून आपला पैसा गमवत असल्याने गावातील महिला आता आक्रमक झाल्या असून हा क्लब तात्काळ बंद करण्यात यावा, गावातील शेतकऱ्यांनी ह्या क्लबच्या नादी लागून आपल्या जीवाचे काही बरे वाईट केल्यास ह्या क्लब ला मान्यता देण्यासाठी सूचना करणाऱ्या मंत्रालायस्तरावरील अधिकाऱ्यास जवाबदार धरण्यात यावे अन्यथा हा क्लब तात्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी गावातील महिलांनी युवा विकास मंचचे पदाधिकारी आदित्य भाके ह्यांच्या नेतृत्वात विरुर पोलीस निरीक्षक ह्यांना भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

