Top News

Adv.Pawan Meshram honored with Constitution Ratna Award.....

ॲड.पवन मेश्राम संविधान रत्न पुरस्काराने सन्मानीत.....




विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकिलीचे शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तळेगाव जिल्हा पुणेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बल्हारशाह येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. पवन मेश्राम यांना संविधान रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.




या कार्यक्रमात उपस्थित विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष ॲड‌. रंजना भोसले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ॲड‌. पवन मेश्राम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे एल.डी. कांबळे, तुकाराम मोरे, किसन थूल यांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post