Top News

Spontaneous response to Ghar Ghar Chalo Abhiyan on behalf of Bharatiya Janata Party in Korpana city and market even in heavy rain.....

भारतीय जनता पार्टीच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो अभियानाला भर पावसात देखील उत्स्फूर्त प्रतिसाद.....


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना  


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकासकांना मिस कॉल देऊन सरकारला समर्थन द्या देवराव भोंगळे माझी भाजपा जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख राजुरा यानी आवाहन केले होते. 



कोरपना तालुक्याच्या वतीने कोरपना शहर व बाजारपेठ येथे घर घर चलो अभियानाला भर पावसात देखील मोठ्या उत्साहात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला देवराव भोंगळे माझी जिल्हा अध्यक्ष तथा विधानसभा प्रमुख यांचे स्वागत नारायण हिवरकर तालुका अध्यक्ष यांनी  केले तसेच महिलांनी राखी बांधून रक्षा बंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात घरचलो अभियानाला सुरुवात करण्यात आली त्यांनी आपल्या मनोगतात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षे केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली व सरल ॲप डाऊनलोड करा या माध्यमातून सरकारच्या विकास कामांची माहिती मिळेल तसेच 9090902024 या नंबर वर मिसकाल देऊन सरकारला समर्थन द्या असे आवाहन केले या अभियानाला व्यापार्यांनी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे खूप खूप आभार मानले व सर्व नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार अध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर, विनायक देशमुख जिल्हा उपाध्यक्ष, विशाल गज्जलवार जिल्हा सचिव, किशोर बावणे सहकार आघाडी प्रमुख, पुरुषोत्तम भोंगळे उपाध्यक्ष, अरुण मडावी माझी सरपंच, अरुण डोहे नगरसेवक, हरीश घोरे शहर महामंत्री, संजय मुसळे जेष्ठ नेते, निलेश ताजने माझी नगरसेवक, कवडु पा जरीले, शशिकांत आडकिने, अमोल आसेकर माझी नगरसेवक, ओम पवार युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष, वसंतराव बहिरे,जया धारणकर इंदिरा कोल्हे,  गीता डोहे नगरसेवक,वर्षा लांडगे नगरसेविका, सविता तुमराम नगरसेवक, संकुलावर सह असंख्य पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.

Previous Post Next Post