भाजप - शिवसेना - राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांचा कांग्रेसमध्ये आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पक्ष प्रवेश.....
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना ग्रामीण प्रतिनिधी : नितेश केराम - 8698423828
कोरपना तालुक्यात कांग्रेसच्या जणसंवाद पदयात्रेला स्थानिक नागरिकांनकडून चागलाच प्रतिसाद मिळत असून कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात गावागावात घरोघरी शेत शिवारात जाऊन काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेसची विकास कामे आणि भाजपच्या भूल थापा या बाबत जनजागृती करीत आहेत. या दरम्यान कोरपना तालुक्यातील गडचांदूर व कुंकूळसाथ येथील भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या वेळी गडचांदूर येथील माजी नगर सेविका चंद्रभागा कोरवते, शिवसेना माजी तालुका अध्येक्ष भारती मडावी, पुरुषोत्तम मेसराम, प्रवीण मेसराम, संतोष देवाळकर, कुकूळसाथ येथील हेरान लोणगडे, अनिल डांगे, बाळा पाटील उपरे, सुदर्शन निबर्ड, भूषण अस्वले, स्वप्नील काकडे, साईनाथ देरकर, विकास पायपरे, सुनील ताजने, देवराव ताजने, अनिकेत वांडरे, रोशन ढोबरे, सौरभ आत्राम, घनशाम ढोबरे, देवळी आत्राम, संकेत कटराईन, अनिल देरकर, भाऊराव सोयाम या सह भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार धोटे यांनी काँग्रेस पक्षाचे दुपटे देऊन सर्वांना काँग्रेसमध्ये प्रवेश दिला या प्रसंगी काँग्रेसचे जेष्ठ नेते जिल्हा मध्येवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लोडे, तालुका अध्येक्ष व कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.
