विद्यानगर वार्ड येथे दहीहंडी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा!
पंचशील चौक मित्र मंडळाने केले होते आयोजन....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
बल्हारशाह शहरातील टेकडी विभागातील विद्यानगर वार्ड पंचशील चौक येथे दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या पंचशील चौक मित्र मंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त प्रभागातील पंचशील चौकात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष समीर केणे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष विष्णू बुजोणे, मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले, माजी नगरसेवक अरुण वाघमारे आदी उपस्थित होते. मनसेचे शहर अध्यक्ष उमेश कुंडले यांच्या हस्ते विजेत्या संघाला पुरस्कार प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे पाहुणे संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष समीर केणे, मनसे उपजिल्हा अध्यक्ष विष्णू बुजोणे, मनसे शहर अध्यक्ष उमेश कुंडले, माजी नगरसेवक अरुण वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेंभुर्णे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार सतीश वासलवार, आकाश मेश्राम, संतोष कोतपल्लीवार, बादल मेश्राम यांनी केला.
योगेश गोरडवार व पंचशील चौक मित्र मंडळ चे बादल मेश्राम, नागेश तोडसाम, आकाश मेश्राम, देवांशू जिवणे, चेतन्या समदुलवार, मनोज तोडसाम, अमोल भंडारे, संतोष कोतपल्लीवार, शुभम कन्नोजवार यांनी कार्यक्रम यशस्वीणे करीता अथक परीश्रम घेतले.



