Top News

Tehsildar Kishore Yadav of Mahur was solidly beaten in the Legislative Council. Will action be taken against the tehsildar, who is destroying the honor of 'revenue'?

माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांची विधान परिषदेत सॉलिड खरडपट्टी....


‘महसूल’ ची इज्जत मातीत घालणाऱ्या तहसीलदारावर आता तरी कारवाई होणार का?


विधिमंडळाच्या पावसाळी अधीवेशनात अंबादास दानवे यांनी मांडले प्रश्न....

 विदर्भ माझा न्युज 24 - माहूर (राजिक शेख विषेश प्रतिनिधी  यवतमाळ जिल्हा) 

लोकप्रतिनिधी पासून सामाजिक कार्यकर्त्या ते सामान्य नागरिकांपर्यंत सगळ्यांनाच अपमानास्पद वागणूक देऊन महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे करण्यासाठी टाळाटाळ करणाऱ्या व नेहमीच भोगवटादार वर्ग दोन जमिनी बेकायदेशीर रित्या नियमानुकूल करून व्यापाऱ्यांच्या घशात घालून कोट्यावधी रुपयाची बेहशोबी मालमत्ता गोळा करणे,गौण खनिजाच्या च्या माध्यमातून वरकमाई कडे झुकता माप देऊन नागरिकांना वेठीस धरणाऱ्या माहूरच्या बेलगाम तहसीलदार किशोर यादव यांची खासदार हेमंत पाटील यांनी परेड घेतल्यानंतर व गल्लीपासून दिल्लीपर्यंत झालेल्या तक्रारीनंतर माहिती अधिकार कार्यकर्ते साजीद खान यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी (ता.३) ऑगस्ट रोजी अवचीत्याच्या मुद्द्यावर माहूर तहसीलदारांची वादग्रस्त कार्यपद्धती मांडल्याने एका वर्षातच तहसीलदार किशोर यादव यांच्यावर निलंबनाची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



शासनाने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी नोकरशाहीची निर्मिती करण्यात आलेली आहे.नोकरशाहीत काम करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कामाचं स्वरुप व न्यायिक चौकट अखून देण्यात आली असे असताना कर्तव्याची जाणीव नसलेल्या उर्मट अधिकाऱ्याला संकट काळात पूरपरिस्थिती उद्भवली असताना संकट समयी नागरिकांना मदत करण्या ऐवजी आपल्या " तोऱ्यात " वावरताना लोकप्रतिनिधी सोबत गैर वर्तन करणे माहूर च्या तहसीलदाराना चांगलेच अंगलट आले आहे.खासदार हेमंत पाटील यांनी माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांना खालच्या पातळीवर सूनविल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे राज्यभर महसूल विभागाची बदनामी झाली,कारण माहूर च्या तहसीलदाराने रुजू झाल्यापासून केवळ गौण खनिज आणि भोगवटादार वर्ग दोन सदरा खालील प्रतिबंधित जमिनी च्या माध्यमातून वरकमाई वर डोळा ठेवला आहे.त्यांना सामान्याचे प्रश्न त्यांचे काम त्यांच्या समस्येचे काही एक देणे घेणे नाही.अनेक प्रकरणात त्यांनी ज्येष्ठ नागरिकांना उद्धट वागणूक देत बाहेर काढले आहे.तर अनेक प्रकरणी भेटण्या साठी गेलेल्या नागरिकांना अपमानित केले आहे.अद्याप पर्यंत त्यांचे कृष्ण कृत्य या साठी बाहेर पडले नाही की ‘मांजरी च्या गळ्यात घंटा बांधणार कोन? 


माहूर तहसील कार्यालयाचे बालिश अधिकारी म्हणून सुपरिचित असलेले वादग्रस्त तहसीलदार किशोर यादव यांना माहूर येथील माहिती अधिकार कार्यकर्ते साजीद खान यांच्या तक्रारीवरून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील केरोळी आणि वाई बाजार येथील भोगवटादार वर्ग दोन प्रकरणाची मुळ संचिका घेऊन मुंबई दरबारी हजर राहण्याचे पत्र पाठवले होत,अधिवेशन काळात विरोधी पक्ष नेत्यांच्या त्या पत्राला देखील तहसीलदार महाशयाने केराची टोपली दाखवून मुंबईला जाण्याचे टाळले,मुळात हीच बाब विरोधी पक्ष नेते दानवे यांना खटकल्याने त्यांनी औचित्याच्या मुद्द्यावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समक्ष माहूर चे तहसीलदार किशोर यादव यांची चांगलीच खरडपट्टी काढली.अधिवेशनादरम्यान मांडलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने प्रशासन किशोर यादव यांच्याविरुद्ध कारवाई करतील? की त्यांची पुन्हा एकदा पाठराखण केली जाईल याकडे आता मात्र संबंध जनतेचे लक्ष लागले आहे.

माहूर तालुक्यातील दोन्ही वादग्रस्त जमीन  प्रकरणात प्रचलित कायद्यानुसार कार्यवाही करण्याचे सर्वाधिकार हे जिल्हाधिकारी यांच्याकडे असताना तहसीलदार माहूर यांनी आर्थिक तर जोडीतून जमिनीचा भोगवटा बदलला या धक्कादायक प्रकरणाची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते साजीद खान यांनी वरिष्ठ पातळीवर केल्यानंतर प्रकरण चौकशीसाठी किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नेहा भोसले यांचे कडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणात तातडीने अहवाल पाठवण्याचे आदेश असताना तीन महिन्याचा कालावधी लोटला तरी सहायक जिल्हाधिकाऱ्याकडून या प्रकरणात अहवाल पाठविण्यात आलेले नाही हे विशेष.

Previous Post Next Post