अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील तीन रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी पायाभरणी कार्यक्रम झाला संपन्न....
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
आज 6 ऑगस्ट रोजी अमृत भारत स्टेशन योजने अंतर्गत बल्लारशाह रेल्वे स्थानकावर पूर्णत्वास आले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील तीन स्थानकांचा भारतातील 508 स्थानकांच्या विकासकामांमध्ये समावेश करून येथील जनतेला भेट दिली आहे. त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.त्यासोबतच स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याचे मत वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री तथा चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यक्रमात व्यक्त केले.
आठवड्यातून तीन दिवस थेट बल्लारशाह ते मुंबई आणि काझीपेठ पुणे रेल्वेची सुविधा लवकरच उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर हैदराबाद वंदे भारत ट्रेनसाठी त्यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, चंद्रपूर आणि बल्लारशाह रेल्वे स्थानकांची काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात सुंदर स्थानकांपैकी एक स्थान म्हणुन नोंद करण्यात अली होती. आज दोन्ही स्थानकांमध्ये अनुक्रमे 34 आणि 27 कोटी रुपये खर्चून विकासकामे होणार असून, चांदा फोर्ट चे 17 कोटी रुपये खर्चून काया पालट करण्यात येणार आहे.
प्रफुल्ल खैरकर एडीआरएम मध्य रेल्वे नागपूर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमात राष्ट्रीय रेल्वे उपभोक्ता सलाहकार परिषद रेल्वे मंत्रालय नई दिल्ली NRUCC सदस्य अजय दुबे, जिल्हा भाजप अध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, माजी आमदार जैनुद्दीन जवेरी, सुदर्शन निमकर आणि एड. संजय धोटे, अपर जिल्हाधिकारी देशपांडे, तहसीलदार डॉ.कांचन जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार अन्नम व्यंकटेश यांनी मानले.


