प्रेस क्लब आर्णीच्या अध्यक्ष पदी राम पवार तर सचिव पदी प्रफुल जाधव यांची निवड....
15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी नविन कार्यकारणीची निवड प्रक्रिया निरंतर चालू...
जर्नलिस्ट वेल्फेअर असोसिएशन द्वारा संचालित आर्णी प्रेस क्लब संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विश्रामगृह आर्णी येथे बैठक पार पडली,सदर बैठकीमध्ये अनेक विषयावर चर्चा करण्यात आली,विशेषता मागील अनेक वर्षापासून 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिना निमित्ताने संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया निरंतर चालू असून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी संघटनेची नविन पदाधिकारी कार्यकारिणी गठित करण्यात आली.संघटनेच्या नवनिर्वाचित कार्यकारणीमध्ये विशेषता ग्रामीण भागातील सदस्यांना संघटनेची जवाबदारी देण्या संदर्भात प्रस्ताव संघटनेचे ज्येष्ठ सदस्य रफिक सरकार यांनी मांडला तर प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गणेश हिरोळे सह इतर सदस्यांनी त्याला अनुमोदन दिले.
प्रेस क्लब आर्णी या संघटनेतील प्रत्येक सदस्याला कार्यकारणीमध्ये स्थान देण्यात बाबत चर्चा करण्यात आली,या चर्चेमध्ये संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून दै.लोकमतचे ग्रामीण पत्रकार राम पवार यांची अध्यक्षपदी,तर उपाध्यक्ष पदी आसिफ शेख दै. लोकमत प्रतिनिधी ( जवळा ) सचिवपदी प्रफुल जाधव ( द केसुला ) तर प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रशिक मुनेश्वर दै.जन माध्यम तालुका प्रतिनिधी यांची नियुक्ती सर्वानुमते निवड करण्यात आली,यावेळी प्रेस क्लब आर्णी संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ हिरोळे,रफिक सरकार,नौशाद अली,विनोद सोयाम,जाफर शेख,राम होले,आशिफ शेख,प्रशिक मुनेश्वर, इरफान रजा,दुर्गेश कर्नेवार,विशाल इंगोले,अरविंद चव्हाण,रमेश राठोड, राम होले,सचिन चहांदे यांच्यासह प्रेस क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.
माजी अध्यक्ष विनोद सोयाम व गणेश हीरोळे यांच्या सह इतर सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देत भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या .

