Top News

Movement of independent Vidarbha ignited....Viraan activists clash with police...... Vidarbha movement is on edge Palale Re Palale Devendra Fadnavis' announcements of Palale shook the area..... Adv. Vamanrao Chatap, Prakash Pohre, Ranjana Mamarde along with thousands of activists arrested....

स्वतंत्र विदर्भाचे  आंदोलन पेटले....विराआंस कार्यकर्त्यांचा पोलिसांशी संघर्ष......विदर्भ आंदोलनाची धार तेज


पळाले रे पळाले देवेंद्र फडनवीस पळाले च्या घोषणांनी परिसर दणाणला.....


ॲड.वामनराव चटप,प्रकाश पोहरे,रंजना मामर्डे यांच्या सह हजारो कार्यकर्त्यांना अटक....



 विदर्भ माझा न्युज 24 - नागपूर  

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने आज दि. ९ ऑगस्ट २०२३ क्रांतीदिनी ‘लॉंग मार्च व उर्जामंत्री निवास घेराव आंदोलन’ करण्यात आले.  आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता शहीद स्मारकावर पुष्पचक्र वाहून देशातील स्वातंत्र्यलढ्यातील शहिदांना स्मरण करून व विदर्भ चंडिका मातेची महाआरती करून “हमकोही इतनी शक्ती देना जंग हम लढे” असे आळवून शहीद चौक येथून एड. वामनराव चटप, रंजना मामर्डे, प्रकाशभाऊ पोहरे, मुकेश मासुरकर, प्रा. प्रभाकर कोंडबत्तूनवार यांनी हिरवी झंडी दाखविल्यानंतर    बाईक रॅलीची सुरुवात करण्यात आली. 



बाईक रॅली ही व्हेरायटी चौक पर्यंत ते संविधान चौक येऊन ती विसर्जित होऊन सर्व रॅलीतील आंदोलक लॉंग मार्च मार्च मध्ये सहभागी झाले.  हा लॉंग मार्च संविधान चौक ते उर्जामंत्री निवास, धरमपेठ पर्यंत आगेकूच करत असताना आंदोलकांना भोळे पेट्रोल पंप चौक येथे अडवण्यात आले असता विराआंस कार्यकर्ते व पोलीसंमध्ये मोठा संघर्ष घडून आला. दोन्ही बाजूने रेटारेटी झाली, बलप्रयोगही करण्यात आला याचे प्रतिउत्तर म्हणून आंदोलकांनी बॅरीकेट तोडून उर्जामंत्री निवासाकडे कूच करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांद्वारे आंदोलकांना मज्जाव घालण्यासाठी अटक सत्र सुरू करून आंदोलन दाबण्याचा पुरजोर प्रयत्न केला. 

यावेळी ५०० हून अधिक आदोलाकानांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांना पोलीस मुख्यालय, पोलीस लाईन टाकळी येथे डीटेन करून ठेवले सत्याग्रहिनी आता शेंडी तुटो कि पारंबी तुटो असी निकराची भूमिका जाहीर केली व लाठी खाऊ-गोळी खाऊ, ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत विदर्भ राज्य मिळवून राहू अशी शपथ घेऊन निर्धार व्यक्त केला व विदर्भ राज्य करु किंवा मरू अन्यथा जेलमध्ये सडू अशी मन्शा ही जाहीर केली व नंतर सायंकाळी  ५.३० वाजता सर्व आंदोलकांना सोडण्यात आले. 

भोळे पेट्रोल पंपजवळ आंदोलकांना थांबवले असता आंदोलकांनी “पळाले रे पळाले उर्जामंत्री पळाले, सरकार विदर्भावादीयोसे डरती है, पुलिस को आगे करती है; दिल्लीत आहे वीज स्वस्त विदर्भाची जनता मात्र वीजदरवाढीने त्रस्त असे म्हणून ३७% वीज दरवाढ तत्काळ रद्द करा;  बाहेर न्या-बाहेर न्या, कोराडी येथील नवीन दोन्ही औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्या, वीज बिलाला लागली आग कधी येणार महाराष्ट्र सरकारला जाग, मुक्त करा-मुक्त करा, शेतकऱ्यांना कृषी पंपाच्या वीजबिलातून मुक्त करा; विदर्भ की जनता ने ललकारा है विदर्भ राज हमारा है; वेगळा विदर्भ झालाच पाहिजे; लेके रहेंगे –लेके रहेंगे विदर्भ राज लेकर रहेंगे; कटेंगे मगर हटेंगे नही” या  घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


या आंदोलनात विदर्भाच्या ११ ही जिल्ह्यातून १२० ही तालुक्यातून ५००० चे वर विदर्भवादी हजार झाले होते व विशेषतः  ५०% युवा व महिलांचा सहभाग होता.  या आंदोलनात पूर्व विदर्भ अध्यक्ष अरुण केदार, शेतकरी संघटनेच्या नेत्या सरोजताई काशीकर, ललित बहाळे, डॉ. रमेशकुमार गजबे, एड. अविनाश काळे, अशोक धापोडकर, अमरावती जिल्हाध्यक्ष राजेंद्र आगरकर, प्रकाश लढ्ढा,  डॉ. विजय कुबडे, दिनकरराव निस्ताने, सुनील साबळे, सतीश प्रेमलवार, राजाभाऊ पुसदेकर, माधवराव गावंडे, गणेश कुसराम, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम पाटील, कृष्णराव भोंगाडे, मनीषा तिरपुडे, अयुब शेख, राहुल खारकर, वाशीम जिल्हा समन्वयक ओमप्रकाश तापडिया, डॉ. विठ्ठलराव घाडगे, बुलढाणा जिल्हाध्यक्ष एड. सुरेश वानखेडे, समन्वयक तेजराव मुंडे, प्रा. राम बारोटे, दासा पाटील व समाधान पाटील कणखर, भंडारा जिल्हाध्यक्ष दिनेश काळे, विनोद बाभरे, ग्यानेंद्र आगाशे, मनीषा फुंडे, अभिजित वंजारी, भंडारा – गोंदिया समन्वयक सुरेंद्र वाढई, जिल्हाध्यक्ष दादाजी फुंडे, अतुल सतदेवे, अकोला जिल्हाध्यक्ष सुरेश जोगळे, शंकरराव कवर, सतीश देशमुख, भाऊराव वानखेडे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राजेंद्रसिंह ठाकूर, अरुण पाटील मुनघाटे, अशोक पोरेड्डीवार, घीसू पाटील खुणे, अर्शी शेख, वर्धा जिल्हा राज ठाकूर, सतीश दानी, शैलाताई देशपांडे, हरिदास मेश्राम गुरुजी, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष किशोर दहेकर, मितीन भागवत, कपिल इद्दे,बल्हारशाह तालुका अध्यक्ष पराग गुंडेवार,शहर अध्यक्ष रोहीत लोनारे,शहर सचिव संदिप केशकर, सुदाम राठोड, नीलकंठराव कोरांगले, अरुण पा. नवले, एड. श्रीनिवास मुसळे,भुषन चिलखे,मिलींद उपगनलावार, शेषराव बोंडे, सुधीर सातपुते, एड. शरद कारेकर, अंकुश वाघमारे, प्रीती दीडमुठे, नागपूर महिला जिल्हाध्यक्षा सुधा पावडे, विष्णुपंत आष्टीकर,  रेखाताई निमजे, सुनीता येरणे, ज्योतीताई खांडेकर, प्रदीप पा. उबाळे, तात्यासाहेब मते, नरेश निमजे, गुलाबराव धांडे, विना भोयर,  एड. मृणाल मोरे, शोभा येवले, गणेश शर्मा, रवींद्र भामोडे, प्रशांत जयकुमार, राजेंद्र सतई, विजय मौदेकर, अमुल साकुरे, तारेश दुरुगकर, अरविंद भोसले, पराग वैरागडे, आदित्य बेले, प्यारुभाई उर्फ नौशाद हुसैन, अशोक पाटील, अनिल बोबडे, विष्णुदास काळमेघ, बाळासाहेब वडतकर, गणेशराव अरबट, गजानन दुधाळ, वसंतराव वैद्य, बाबाराव वाघमारे, प्रा. वीरेंद्र इंगळे, संजय चौधरी, गोविंद चव्हान, रफिक रंगरेज, अशोक कपिले, सोनाली मर्गडे, श्रीधर ढवस, राजेंद्र झोटिंग, अक्षय महाजन, माधुरी चौहान, मनोहर सहस्रबुद्धे सह हजारो आंदोलक सहभागी झाले होते. 

Previous Post Next Post