शहीद चौक तुकुम येथे आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त जडी बुटी वितरण....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
स्थानिक एसटी वर्कशॉप जवळील शहीद चौक तुकुम येथे पतंजली योग समिती. भारत स्वाभिमान. किसान सेवा समिती व युवा भारत चंद्रपूर च्या वतीने आयुर्वेदाचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त जडी बुटी वितरण कार्यक्रम सकाळी ठीक 06.00 वाजता दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमांमध्ये प्रमुख अतिथी म्हणून प्रभाग क्रमांक 01 चे लोकप्रिय माजी नगरसेवक सुभाष कासंनगोटूवार हजर होते तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत स्वाभिमानचे जिल्हा प्रभारी विजयराव चंदावार , उपाध्यक्ष शरद व्यास, सुधाकर श्रीपुरवार , सपना नामपल्लीवार, रमेश ददगल, मुरलीधर शिरभये, हरिदास कापटे, मधुकर राजूरकर, अरविंद सोनी, रवी इंगोले, प्रकाश कासरलावार, हरडे , सुवर्णा लोखंडे, वैजयंती गहुकर, कविता मंगाणी व सर्व योगा क्लासेस चे सर्व साधक साधिका शिक्षक सह योग शिक्षक , सदस्य हजर होते. व्यास यांनी जडीबुटी चे महत्व सांगून प्रत्येक जडीबुटी ची महिती दिली.
