ITI शिल्प निदेशक (CITS) प्रशिक्षणार्थी वर अन्याय - अर्जुन शंकर जाधव (CITS प्रशिक्षणार्थी)
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
सि टी आय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांवर अन्याय करण्यात आला आहे. सि टी आय प्रशिक्षण हे फक्त आय टी आय निदेशक या पदासाठी चालते त्याला इतर कोणत्याच ठिकाणी विचारत नाही,ऐवढेच नाही तर जर नाॅन सि टी आय प्रशिक्षणार्थी निदेशक म्हणून लागला तर त्याला सुध्दा काही कालावधीत सरकारी खर्चाने सि टी आय पूर्ण करून घेतले जाते, सि टी आय प्रशिक्षण पूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना काही अधिकारी स्वतच्या स्वार्थासाठी त्याच्या भविष्यावर लात मारत आहेत. मुळात आय टी आय प्रशिक्षण हे प्रॅक्टिकलशी निगडीत आहे. डिग्री अथवा डिप्लोमा यांना इतर सव॔ क्षेत्रात सेवा देण्यासाठी संधी उपलब्ध असतात. सि टी आय प्रशिक्षण मुळातच आय टी आय प्रशिक्षकासाठी आहे. गांभिर्याने जर विचार केला तर एक तर सि टी आय काॅलेज बंद करा अथवा सि टी आय प्रशिक्षण कंपल्सरी करा तेव्हाच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल आणि सरकारला सुध्दा फायदा दोन्ही बाजूने होईल. सरकारचा इतर खर्च वाचेल..
ज्या प्रकारे प्राथमिक शाळेवर आणि अन्य विद्यालयावर शिक्षकासाठी Dted व Bed कंपल्सरी केलेले आहे तर iti शिक्षकांसाठी CITS का नाही?

