मणिपूर हिंसा, अत्याचार प्रकरणातील दोषींना फाशी द्या शेकडो महिलांची धरणे आंदोलनातून मागणी....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
मणिपूर राज्यातील आदिवासी महिलांची नग्न अवस्थेत काढलेली धिंड, बलात्कार व हत्या प्रकरणातील सर्वच आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करत सावळी सदोबा व परिसरातील शेकडो महिलांनी नायब तहसील कार्यालयासमोर ऐक दिवसीय धरणे आंदोलनातून केंद्र सरकारकडे मागणी केली.
गेल्या तिनं महिन्यापासून सतत पेटत असलेल्या मणिपूर राज्यांकडे केंद्र सरकार लक्ष द्यायला तयार नाही ,महिलांना नग्न करून त्यांची धिंड काढली गेली , अनेक आदिवासींच्या हत्या करण्यात आल्या तरी देशाचे पंतप्रधान मणिपूर ला जात नाही , केंद्र सरकार तेथील परिस्थिती आटोक्यात आणू शकले नाही तर मणिपूर राज्य सरकार या सर्व आघाड्यांवर सपशेल फेल ठरल्याने तेथील राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती शासन लावा अशी मागणी अनेक महिलांनी आपल्या भाषणातून केली.
देशाला आजादी मिळून 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून आपण आजादीचा अमृत महोत्सव साजरा करतो महिलावर होणाऱ्या अत्याचारावर लक्ष वेधून त्या सर्व नराधमास फाशीची शिक्षा झाल्यास हा खरोखर आजादीचा अमृत महोत्सव साजरा होईल अशी प्रतिक्रिया शहीद विरपत्नी श्रीमती कुंतीताई ज्ञानेश्वर आडे यांनी व्यक्त केली.
महिलाओपर अत्याचार बंद करो,आदिवासीओपर अत्याचार बंद करो,मनिपुर में हिंसा को बंद करो,मणिपूर मे राष्ट्रपती शासन लागू करो,मणिपूर सरकार मुर्दाबाद ,एक तीर एकसमान सारे आदिवासी एक समान ,भारत माझी माऊली ,संविधान त्याची सावली,फुल नही चिंगारी है ये भारत की नारी है, मणिपूर प्रकरणातील दोषींना फाशी द्या, अशा गगनभेदी घोषणांनी महिलांनी परिसर दणाणून सोडला. सावळी सदोबा पोलीस चौकीचे ठाणेदार संदिप बारिंगे , आर्णी तहसीलचे सप्परवार यांना निवेदन देण्यात आले.विरपत्नी कुंतीताई ज्ञानेश्वर आडे व रेखा मडावी यांच्या नेतृत्व एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी वनिता रामटेके, रेखा मडावी , मंजिता शिंदे , यांची भाषणे झाली,धरणे आंदोलनात निशा राठोड, माधुरी गवळी, निर्जला खरतडे, रेखा चव्हाण, माला माने, शशीकला पुसनाके, कल्पना महले , कल्पना वेटटी ,निशा उईके , लक्ष्मी चव्हाण, दिपाली गेडाम, अंजना गेडाम यासह शेकडो महिलां उपस्थित होत्या.
