हत्तेने हादर्ले राजुरा शहर.......भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर गोळीबार......
पुर्वशा सचिन डोहे यांचा गोळीबारात मृत्यु.....
विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
चंद्रपूर जिल्हातील राजुरा येथे अज्ञात इसमाने केलेल्या गोळीबारात भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांची पत्नी पूर्वशा हीचा जागीच मृत्यू झाला असुन लल्ली नामक व्यक्तीच्या पाठीला गोळी लागल्याने त्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले असल्याची माहिती आहे.
मीळालेल्या माहितीनुसार सोमनाथपूर वॉर्ड येथे राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती राजुरा शहरात आले होते. ही बाब लल्ली याच्या लक्षात येताच तो रात्री 8 ते 8:30 च्या दरम्यान भाजप युवा मोर्चा चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी सचीन डोहे यांच्या पत्नी पूर्वशा सचीन डोहे अंगणात आल्या अंधाधुंद सुरू असलेल्या गोबीळारात त्यांना छातीत गोळी लागली व त्यां जागीच खाली पडल्या तर या गोळीबारात लल्लीच्या पाठीला गोळी लागली.
सदर घटना लक्षात येताच घरात उपस्थीत असलेल्या मंडळींनी शेजाऱ्यांच्या मदतीने दोघांनाही तत्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पूर्वशा सचीन डोहे ह्यांना मृत घोषित केले तर गंभीर जखमी असलेल्या लल्ली ह्याला चंद्रपूर येथे हलविण्यात आले. सदर घटनेच्या वेळी भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे हे आपल्या काका माजी नगरसेवक राजेंद्र डोहे ह्यंच्या सह बाहेर गेले होते.

