राजु झोडे यांचे सह वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या जवळपास १०० कार्यकर्त्यांना चंद्रपूरात अटक.....
विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)
चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांची बैठक उधळून लावली,
याच वेळी पोलिसांनी जवळपास उलगूलान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजु झोडे यांच्या सह वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या जवळपास १०० पदाधिकारी व कार्यकरत्यांना ताब्यात घेतले व सुटका केली. यावेळी कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करत असून नुकतेच महाराष्ट्र व संपूर्ण भारताची बदनामी केली, संभाजी भिडे हे देशद्रोही असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देशभरातून होत आहे,असे विधान राजु झोडे यांनी व्यक्त केले.
चंद्रपूर शहरातील अग्रसेन भवनात संभाजी भिडे यांची आज रविवारी बैठक होती.याची माहिती होताच उलगुलान संघटना, वंचित बहुजन आघाडी, भीम आर्मीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अग्रसेन भवन परिसरात जाऊन जोरदार घोषणाबाजी करत भिडे यांची बैठक उधळून लावली.
त्यानंतर चंद्रपूर पोलिसांनी राजु झोडे यांचे सह जवळपास 100 जणांना ताब्यात घेतले व सुटका केली आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, जयदीप खोब्रागडे सदानंद करमनकर, भिम आर्मी चे तालुका अध्यक्ष अमर धोंगडे,बबलू करमनकर,रोहन कळसकर,प्रदीप झामरे, गौतम रामटेके यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.


