Top News

Today all Anganwadis, pre-primary and primary schools, schools and colleges in Chandrapur district are closed due to heavy rain...District Officer's order issued..... But the 10th and 12th supplementary exams will continue as per the schedule.....

आज चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये अतिवृष्टीमुळे बंद...जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश निर्गमित.....


मात्र दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहतील.....



 विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)


ज्याअर्थी चंद्रपूर जिल्ह्यात आज दिनांक 21/07/2023 रोजी झालेल्या अतिवृष्टी झाली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याच्या वर्तवलेल्या अंदाजानुसार दिनांक 22/07/2023 रोजी चंद्रपूर जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. आणि ज्याअर्थी चंद्रपूर जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यावर होऊ नये या करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक

22/07/2023 रोजी सुट्टी असणे आवश्यक असल्याचे जी‌ सी, जिल्हाअधीकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विनय गौडा यांनी जाहीर केलेल्या आदेशात म्हटले आहे‌.

 विनय गौडा जी सी, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर, यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 30 (2) (5) व (18) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करुन, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, पुर्व प्राथमिक व प्राथमिक शाळा, विद्यालये व महाविद्यालये यांना दिनांक 22/07/2023 रोजी सुट्टी जाहिर केली आहे. मात्र, इयत्ता

दहावी व बारावी पुरवणी परिक्षा वेळापत्रकानुसार सुरु राहतील आणि सर्व निवासी शाळा नियमितपणे सुरु राहतील. 

तरी नागरीकांनी भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार सतर्क राहून आवश्यक खबरदारी घ्यावी व आपतकालीन परिस्थितीत खालील दिलेल्या ठिकाणी संपर्क साधावा.

1. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर
संपर्क क्र. 07172251597 / 07172272480

Previous Post Next Post