डाॅ.ऍड.अंजली साळवे विटनकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती.
७२, बल्लारपूर विधानसभे करीता साळवे यांच्या नावाची चर्चा...
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह : उपसंपादक गौतम कांबळे
डाॅ.ऍड.अंजली साळवे विटनकर हे नाव काही आपल्यासाठी नवीन नाही. राज्यात ओबीसी जनगणने साठी प्रथम आवाज उचलनारी आणी पाटीलावा मोहिम सुरू करनारी डाॅ.ऍड.अंजली साळवे ह्या पुढे कालांतराने "पाटीवाल्या ताई" म्हणनुन महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्यात पाटीवाली ताई आमच्या पक्षात यावे असा प्रतेक राजकीय पक्षाला वाटु लागले होते.
शेवटी ती वाट संपली डाॅ.ऍड.साळवे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला असुन पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आदेशाने प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल यांनी डाॅ.ऍड.अंजली साळवे विटनकर यांची महाराष्ट्राच्या प्रदेश सरचिटनीस पदि नियुक्ती केली आहे.
तर साळेवे या मुळ बल्हारशाह तालुक्यातील बामणी गावच्या असल्याने त्यांच्या नियुक्ती मुळे आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. तर अंजली साळवे यांच्या नियुक्तीने अनेकांना जबर धक्का बसला आहे.
साळवे यांच्या समर्थकांन मध्ये चांगलीच चर्चा रंगली असुन ७२,बल्लारपूर विधानसभे करीता राष्ट्रावीच्या उदेवार म्हणुन साळवे यांच्या नावाची चर्चा समर्थकांन मध्ये रंगली आहे.
