Top News

कोरपना तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येथे स्वयंसेवी ग्रामविकास संस्थेच्या वतीन आयोजित केलेल्या तिन अंकी नाट्यपुष्प संगीत जिवलगा नाटकाच्या उद्घाटन थाटात संपन्न. The opening act of the three-act play Natyapuspa Sangeet Jivalga, organized by Swayamsevi Gram Vikas Sanstha at Mauja Kanhalgaon in Korpana taluka, concluded.

कोरपना तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येथे स्वयंसेवी ग्रामविकास संस्थेच्या वतीन आयोजित केलेल्या तिन अंकी नाट्यपुष्प संगीत जिवलगा नाटकाच्या उद्घाटन थाटात संपन्न.




विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना : ग्रामीण प्रतिनिधी : नितेश केराम

कोरपना तालुक्यातील मौजा कान्हाळगाव येथे स्वयंसेवी ग्रामविकास संस्थेच्या वतीन आयोजित केलेल्या तिन अंकी नाट्यपुष्प संगीत जिवलगा नाटकाच्या उदघाटनीय कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून लाभलेले देवराव भोंगळे विधानसभा प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उपस्थित होते. 

याठिकाणी मोठया संख्येने उपस्थित असलेल्या नाट्यरसिकांनी नाटकाचा आनंद घ्यावा नाटकातून मिळणारा सुंदरविचार सुखी जिवनाचा सुप्त संदेश आपल्या जीवनात अंगीकारावा अशी भावना वेक्त केली या सोबतच रंगदेवतेची सेवा करणाऱ्या कलावंतांना यशस्वी नाट्यप्रयोगासाठी शुभेच्छा ही दिल्या तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत वेक्त केले.

या वेळी विजयराव बावणे सिडीसीसी बँकेचे संचालक, भाजपाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, सुरेखा नवले, सरपंच दामोधर पा मालेकार, माजी सरपंच अरुण पा नवले, माजी सरपंच आबिद अली, राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते सुरेश मालेकर, गणेश गोढे, विजयराव मसे, सुभाष तुरंनकर, उमेश पेंदोर, सरपंच दिवाकर वासेकार, गोवर्धन मडावी, रोशन मरापे, महादेव कोवे, रमेश मोहुर्ले, मायाबाई भोयर, महानंदा शेंडे, वदंना सोयाम अनिता दुर्वे यासह आदि मान्यवर मंच्यावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक महिला पुरुष नवयुवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मसे यांनी केले तर आभार मनोज गोरे यांनी मानले.

Previous Post Next Post