Top News

Breaking_Accused in that firing in Rajura in police custody...... Two accused arrested in just two hours....country pistol and three rounds of live bullets seized...... Some policemen came to Rajura by train and some policemen waded through waist-deep water to perform their duty...

Breaking_राजुरा येथील त्या गोळीबारातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात......


अवघ्या दोन तासात दोन आरोपींना अटक....देशी पिस्टल व तीन राउंड जिवंत गोळ्या जप्त......


काही पोलिसांनी रेल्वेने तर काही पोलिसांनी कंबरभर पाण्यातून राजुरा येथे येऊन कर्तव्य बजावीले......



विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा 


गेल्या काही दिवसांनपासुन  जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाने प्रशासन आपली यंत्रणा खंबीर पने राबवित असताना आलेल्या पुराने जनजीवन अक्षरशःह विस्कळीत झाले होते, अश्यातच जिल्हातील राजुरा तालुक्याचा  रस्त्याच्या मार्गाने संपर्क तुटला असतांना त्यातच रविवारी रात्री ८:३० ते ९:०० वाजताच्या दरम्यान शहरातील स्थानिक आठवडी बाजार वार्डात राहणारे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांच्या घरावर गोळीबार झाला, त्यात सचिन डोहे यांची पत्नी पूर्वशा (वय २७) हीचा मृत्यू झाला होता.

हे ही वाचा.....👉🏻 हत्तेने हादर्ले राजुरा शहर.......भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर गोळीबार......

आठवडी बाजार वॉर्डात राहणाऱ्या लल्ली नामक व्यक्तीला वैयक्तिक शत्रुत्वातून मारण्यासाठी अज्ञात व्यक्ती शहरात आले होते. ही बाब लल्ली याचा लक्षात येताच तो  भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे ह्यांच्या घरात शिरला. तेव्हा मागावर असलेल्या मारेकऱ्यांनी त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. नेमक्या त्याच वेळी पूर्वशा डोहे अंगणात आल्याने पूर्वशा डोहे यांना मान आणि छातीच्या मधल्या भागात गोळी लागल्याने त्या जागीच कोसळल्या तर लल्लीच्या पाठीला गोळी लागली,

हे ही वाचा.....👉🏻 हत्तेने हादर्ले राजुरा शहर.......भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर गोळीबार......

मारेकरी दुचाकीवर होते. हि वार्ता वाऱ्यासारखी शहरात पसरली व शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चार चमू तयार केले एका चमूला दवाखान्यात तर अन्य तीन चमूला तपासकार्यात लावले आणि अवघ्या दोन तासात पोलिसांनी एक नाबालीक व एक लवज्योतसिंह देवल वय १९ वर्षे सोमनाथपूर वॉर्ड राजुरा यांना अटक केली. आरोपीकडून देशी पिस्टल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीकडून एक देशी बनावटीचे पिस्टल मधून चार राउंड गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पोलिसांनी पिस्टल मधून तीन राउंड जिवंत गोळ्या जप्त केल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लल्ली ने मारेकऱ्याचा भावाला दोन वर्षाआधी मारहाण केली होती तो राग आरोपीचा मनात होता जुन्या वैमनस्यातून हे प्रकरण घडले.

हे ही वाचा.....👉🏻 हत्तेने हादर्ले राजुरा शहर.......भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर गोळीबार......

मात्र मृतक पूर्वशा यांना गोळी लागल्याने त्यांचा निष्पाप बळी गेला. लल्ली ला ग्रामीण रुग्णालय राजूरा येथे आणण्यात आले होते. तर त्याला चंद्रपूरला पाठविण्यात आले मात्र नदीला पूर असल्याने लल्ली ला एम्बुलन्स ने राजुरा वरुन गोवरी मार्गाने माथरा गावाच्या पूर्वी रेल्वे मार्ग होता त्याला यावर्षी काढण्यात आले तेथून रस्ता तयार करण्यात आला होता त्याचमार्गाने चारचाकी वाहन सास्ती कोळसा खाण परिसरातून जाऊ शकतात त्यामुळे त्यामार्गाने चंद्रपूरला पाठविण्यात आले. लल्लीचा तेथे उपचार सुरू आहे.

कुणी रेल्वेने तर कुणी कंबरभर पाण्यात कर्तव्य बजावीले....

ह्या गोळीबाराच्या घटनेने जिल्ह्यात एकाच खळबळ उडाली. नदीत पूर असल्याने चंद्रपूर वरून पोलीस अधिकारी व पोलिसांना बोलावणे कठीण होते तरी सुद्धा कार्यकर्तृत्वाची जाण असलेल्या पोलिसांनी पाण्यातून, चिखल तुडवत, कुणी रेल्वेने राजुरा गाठले आणि कायदा व्यवस्था राखण्यात भूमिका बजावली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रीना जनबंधू  ह्या प्रकरणात लक्ष देत आहेत. परिविक्षाधीन पोलिस निरीक्षक विशाल नागरगोजे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, ओमप्रकाश गेडाम, सदानंद वराडकर, तिरुपती जाधव, खुशाल टेकाम, राज भिंगेवार, शेखर माथनकर, महेश कोंडावार ह्यांचे नेतृत्वातील पथकाने तत्काळ तपास हाती घेऊन मारेकऱ्यांचा शोध घेणे सुरू केले. पोलिसांना आरोपींना अवघ्या दोन तासात अटक करण्यात यश आले. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या कारवाईनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींवर भादंवी च्या कलम ३०२, ३०७, ३४ मुंबई पोलीस अधिनियम १३५ व भारतीय हत्यार कायदा ३ /२५ अन्वये गुन्हा नोंद केला, समोरील तपास सुरु आहे.

हे ही वाचा.....👉🏻 हत्तेने हादर्ले राजुरा शहर.......भाजयुमोच्या जिल्हा उपाध्यक्षांच्या घरावर गोळीबार......


पालकमंत्री मुनगंटीवारांनी दिले होते तातडीचे आदेश....

भारतीय जनता पार्टी युवामोर्चाच्या उपजिल्हा अध्यक्षांच्या पत्नीचा गोळीबारात मृत्यू झाल्याने याची गंभीर दखल पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यामध्ये कोणीही अवैधरित्या शस्त्र बाळगल्यास त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश पालकमंत्री मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहे. सोबतच या घटनेच्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देखील मुनगंटीवार यांनी दिले आहे.




Previous Post Next Post