अँड शिवाजीराव मोघे यांनी केली आर्णी तालुक्यातील पुर ग्रस्त भागाची पाहणी.....
त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई जाहीर करा आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाला दिल्या सुचना.....
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी
गेल्या दोन दिवसात झालेल्या ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. यातच आर्णी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये नदीला आलेल्या पुराच्या मोठा फटका बसला आहे.
यात शिवर, भंडारी, बेलोरा, राणी धानोरा, साकुर, मुकिंदपूर, कवठा बाजार गावांचा समावेश आहे. या सर्व गावांना माजी मंत्री तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे यांनी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली, पूरग्रस्तांना धीर दिला. शेती आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने झालेले नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. याची शासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरित पंचनामे करावे व नुकसान भरपाई जाहीर करावी अशा सूचना अँड शिवाजीराव मोघे आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक प्रशासनाला दिल्या..

